Homeमहत्त्वाचे२१ डिसेंबरला वडगाव नगरपंचायतीची मतमोजणी; सकाळी १० वाजल्यापासून प्रक्रिया

२१ डिसेंबरला वडगाव नगरपंचायतीची मतमोजणी; सकाळी १० वाजल्यापासून प्रक्रिया

२१ डिसेंबरला वडगाव नगरपंचायतीची मतमोजणी; सकाळी १० वाजल्यापासून प्रक्रिया

वडगाव : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२५ करिता मतदान प्रक्रिया दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी शांततेत पार पडली असून, माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणुकीची मतमोजणी रविवार, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया सकाळी ठीक १० वाजल्यापासून वडगाव नगरपंचायत सभागृह येथे सुरू होणार आहे.

मतमोजणी प्रक्रियेसाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, एकूण सात मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहेत. प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक सहाय्यक व एक शिपाई अशी नेमणूक करण्यात आली आहे.

या मतमोजणीमध्ये एकूण २४ मतदान केंद्रांतील मतांची मोजणी १७ प्रभागांसाठी करण्यात येणार आहे. मतमोजणी टेबल प्रभागनिहाय असणार असून, प्रत्येक टेबलवर संबंधित प्रभागातीलच मतदान यंत्रे ठेवण्यात येणार आहेत. मतमोजणी एकूण चार फेऱ्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. कोणत्या टेबलवर कोणत्या प्रभागाचे व कोणत्या मतदान केंद्राचे मशीन असणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती मतमोजणी कक्षामध्ये फलकाद्वारे लावण्यात आलेली आहे.

मतमोजणीपूर्वी सकाळी ९.३० वाजता स्ट्रॉंग रूम उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत व्हिडिओ चित्रीकरण करून उघडण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

सदर प्रक्रियेसाठी नगराध्यक्ष व सदस्य उमेदवारांचे अधिकृत मतमोजणी प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाणार असून, यापूर्वी निवडणूक विभागाकडे नावे सादर करून ओळखपत्र प्राप्त झालेल्या प्रतिनिधींनाच मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाईल. ओळखपत्राशिवाय कोणालाही मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नगरपंचायत कार्यालयाच्या तळमजल्यावर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी नागरिक, उमेदवार व उमेदवार प्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

तसेच मतमोजणीच्या अनुषंगाने उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसाठी शुक्रवार, दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वडगाव नगरपंचायत कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली असून, सर्व संबंधितांनी उपस्थित राहून आवश्यक माहिती घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.

अशी माहिती वडगाव नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!