उद्या तळेगावात जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५ चे आयोजन
तळेगाव दाभाडे : शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार आहे. ज्ञानदानाच्या माध्यमातून पिढ्यान्पिढ्या घडवणाऱ्या या शिक्षकवृत्तीचा गौरव करण्यासाठी उद्या रविवार, दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता तळेगाव दाभाडे येथील सुशीला मंगल कार्यालयात जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
हा सोहळा अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक महासंघ व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाशी संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ तसेच नगरसेवक संतोष भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पुणे पीपल्स को-ऑप बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक बबनराव भेगडे भूषविणार आहेत.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील निवडक गुणवंत शिक्षकांचा सत्कार व सन्मान होणार आहे. गौरव सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून खालील मान्यवर शिक्षकांना पुरस्कार प्रदान करणार आहेत:
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके, शिक्षक आमदार पुणे विभाग भगवानराव साळुंखे
कार्यक्रमाला विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग डाॅ. गणपतराव मोरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) पुणे डाॅ. भाऊसाहेब कारेकर, पी.एम.आर.डी. सदस्य संतोष छबुराव भेगडे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मावळ सुदाम वाळुंज, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे अध्यक्ष निलेश काशीद, कार्यवाह महेंद्र शेलार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
या पुरस्कार सोहळ्यामुळे मावळ तालुक्यातील व पुणे जिल्ह्यातील शिक्षकांच्या सेवाभावी कार्याचा गौरव होणार असून, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाला नवा सन्मान लाभणार आहे. शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरणार आहे
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अशोकराव कराड (कार्याध्यक्ष), देवराम पारिठे (कार्यवाह), राम कदमबांडे (अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ), नगरसेवक संतोष छबुराव भेगडे, डोळसनाथ नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे, खजिनदार अमित भसे तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळची संपूर्ण कार्यकारिणी व सदस्य, नगरसेवक संतोष भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे सर्व सदस्य सक्रिय आहेत.
(प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे, मो. ९९२१८०७०११)



















