कामशेत मध्ये लहान मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
कामशेत : शहरातील क्रिस्टल क्लिनिक या लहान मुलांच्या दवाखान्यात शुक्रवार दिनांक ६ जून २०२५ रोजी सकाळी १०ते दुपारी ४: वाजेपर्यंत लहान मुलां करिता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती बालरोगतज्ञ डॉ अश्विनी शिरसाट- बांगर यांनी दिली आहे.
या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात वय वर्ष ०ते १८ वयोगटातील लहान मुलांची मोफत आरोग्य तपासणी होणार असून. फुगे कॉम्प्लेक्स साईबाबा चौक कामशेत बाजारपेठ या ठिकाणी असणाऱ्या क्रिस्टल क्लिनिक या दवाखान्यात सदरील आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे.
बालरोगतज्ञ डॉ अश्विनी शिरसाट- बांगर, तज्ञ दंतवैद्य डॉ निलेश लोनगे, तज्ञ नेत्रचिकित्सक डॉ किशोर खडसे हे डॉक्टर तपासणी करणार आहे. तरी जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांची मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन क्रिस्टल क्लिनिक कडून करण्यात आले आहे. अधिक माहिती करता ९०८२२३८३३२८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता.
प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११




















