Homeमहत्त्वाचेकिवळे एक्सप्रेस-वेवरील पुलाखाली अज्ञात महिलेचा मृतदेह; परिसरात खळबळ, पोलिसांचा जलदगतीने तपासाला सुरुवात

किवळे एक्सप्रेस-वेवरील पुलाखाली अज्ञात महिलेचा मृतदेह; परिसरात खळबळ, पोलिसांचा जलदगतीने तपासाला सुरुवात

किवळे : येथील एक्सप्रेस वे महामार्गावरील सर्व्हिस रोड शेजारील पुलाखाली शनिवारी (ता. १५) दुपारच्या सुमारास अंदाजे ३५ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. अचानक उघडकीस आलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मृत्यूचा संशयास्पद स्वरूप पाहता पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे.

प्राथमिक पाहणीदरम्यान मृतदेहावर कोणतीही ओळख पटवणारी माहिती मिळाली नाही. त्यामुळे ही महिला बाहेरील भागातील असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटनेत गुन्हेगारीचा तपास करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व शक्यता तपासण्यास सुरुवात केली आहे.

मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण समोर येण्यासाठी पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा आहे. प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवत तपास अधिक वेगाने पुढे नेला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित पोलिस पथके सीसीटीव्ही फूटेज, आसपासच्या व्यक्तींची चौकशी तसेच अलीकडील बेपत्ता तक्रारींचे रेकॉर्ड तपासत आहेत. महिला कोण आणि तिचा मृत्यू कशामुळे झाला याबाबतचे सर्व प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.

मृत महिलेची ओळख किंवा घटनेविषयी कोणतीही माहिती उपलब्ध असल्यास त्वरित देहूरोड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी केले आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!