वडगाव नगरपंचायत निवडणूक : ८९ पैकी ७७ नामनिर्देशन अर्ज वैध, १२ अर्ज अवैध
वडगाव | दि. १८ नोव्हेंबर २०२५ मा. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक–२०२५साठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात उमेदवारांच्या उपस्थितीत पार पडली. एकूण ८९ नामनिर्देशन पत्रांपैकी ७७ अर्ज वैध ठरले असून १२ अर्ज अवैध घोषित करण्यात आले आहेत.

निवडणुकीसाठी नगराध्यक्ष (महिला) तसेच नगरसेवक पदाकरिता अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर होती. त्यानुसार कालपर्यंत एकूण ८९ अर्ज दाखल झाल्याची नोंद निवडणूक कार्यालयात करण्यात आली होती.

नगराध्यक्ष (महिला) पदाकरिता एकूण ७ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी ६ अर्ज वैध ठरले असून १ अर्ज अवैध घोषित झाला आहे.
नगरसेवक पदासाठी ८२ अर्जांपैकी ७१ अर्ज वैध
नगरसेवक पदाकरिता महिलांचे ३४ अर्ज आले होते, त्यापैकी २७ अर्ज वैध ठरले.
पुरुष उमेदवारांचे ४८ अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी ४४ अर्ज वैध ठरले.
या प्रमाणे नगरसेवक पदाकरिता एकूण ७१ अर्ज वैध घोषित करण्यात आले आहेत.

प्रभागनिहाय छाननी निकाल पुढीलप्रमाणे
प्रभाग १ : ४ पैकी ३ वैध
प्रभाग २ : ६ पैकी ६ वैध
प्रभाग ३ : ७ पैकी ७ वैध
प्रभाग ४ : ३ पैकी ३ वैध
प्रभाग ५ : ६ पैकी ५ वैध
प्रभाग ६ : ६ पैकी ४ वैध
प्रभाग ७ : ६ पैकी ५ वैध
प्रभाग ८ : ४ पैकी ३ वैध
प्रभाग ९ : ८ पैकी ५ वैध
प्रभाग १० : २ पैकी २ वैध
प्रभाग ११ : ५ पैकी ५ वैध
प्रभाग १२ : ३ पैकी ३ वैध
प्रभाग १३ : ८ पैकी ८ वैध
प्रभाग १४ : ३ पैकी ३ वैध
प्रभाग १५ : ३ पैकी २ वैध
प्रभाग १६ : ५ पैकी ५ वैध
प्रभाग १७ : ३ पैकी २ वैध
निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मनिषा तेलभाते व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रविण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण छाननी प्रक्रिया पार पडली. उमेदवार, प्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवडणूक नियमांनुसार सर्व अर्जांची सखोल छाननी करून वैध व अवैध अर्ज जाहीर करण्यात आले.
निवडणूक कार्यालयात संपूर्ण प्रक्रिया शांत, पारदर्शक व नियमानुसार पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.




















