ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोपान शंकर वाडेकर (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मावळ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सोपान वाडेकर हे एक शांत, संयमी आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. गावातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
ते कार्ला गावातील उद्योजक सचिन वाडेकर यांचे वडील होते. तसेच माजी पंचायत समिती सभापती जनाबाई शंकरराव हुलावळे यांचे बंधू होते. मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नितीन वाडेकर, उद्योजक समीर वाडेकर, सोमनाथ वाडेकर यांचे ते चुलते होते.
अंत्यविधी आज (दि. १७ जुलै) सकाळी १० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र शेजारील स्मशानभूमी कार्ला येथे होणार आहे.



















