Homeसामाजिकप्रसिद्ध व्याख्याते विवेक गुरव यांना स्टार आयकॉन पुरस्कार जाहीर

प्रसिद्ध व्याख्याते विवेक गुरव यांना स्टार आयकॉन पुरस्कार जाहीर

प्रसिद्ध व्याख्याते विवेक गुरव यांना स्टार आयकॉन पुरस्कार जाहीर

वडगाव : मावळ तालुक्यातील सुप्रसिद्ध व्याख्याते विवेक गोविंदराव गुरव यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल या वर्षाचा मानाचा समजला जाणारा स्टार आयकॉन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात सोमवार दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५:ते सायंकाळी ७:३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात हा स्टार आयकॉन पुरस्कार भास्कर भूषण यांच्या १४ वर्धापन दिनानिमित्त गुरव यांना प्रदान करण्यात येणार आहे.

गुरव यांना त्यांच्या कार्याबद्दल आतापर्यंत राज्यातील अनेक संस्थांनी राज्यस्तरीय पुरस्कार बहाल केले आहे. गुरव यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रात आठ हजारापेक्षा जास्त विषयावर व्याख्याने देऊन समाज प्रबोधन केले आहे. यशदा या शासकीय संस्थेमध्ये ते मास्टर ट्रेनर असून अनेक शासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे.

तसेच अनेक प्रशासकीय व निमशासकीय व्यक्तींना अनेक विषयावर गुरव हे सातत्याने मार्गदर्शन करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच या वर्षाचा स्टार आयकॉन हा मानाचा पुरस्कार गुरव यांना जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी देखील विवेक गुरव यांना भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय कलारत्न पुरस्कार, राज्यस्तरीय संवाद रत्न पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श व्याख्याता पुरस्कार, राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार, राज्य युवा भूषण पुरस्कार, राज्यस्तरीय संत गाडगेबाबा पुरस्कार, राज्यस्तरीय सरस्वती विद्यारत्न पुरस्कार, राज्य समाज रत्न पुरस्कार, मावळ रत्न पुरस्कार, मावळ भूषण पुरस्कार, लोकराज्य न्यूज चैनल ने२०२५ महाराष्ट्र भूषण पुरस्कार आदी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे.

अत्यंत मानाचा समजला जाणारा स्टार आयकॉन पुरस्कार जाहीर झाल्याने विवेक गुरव यांचे संपूर्ण मावळ तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!