तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे – तहसीलदार विक्रम देशमुख
वडगाव मावळ : येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य बीए महाविद्यालय येथे नवोदित विद्यार्थ्यांच्या स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तरुणांनी व्यसनापासून दूर राहण्याचे, मोबाईलचा अतिवापर टाळण्याचे आणि समाजमाध्यमांच्या आहारी न जाण्याचे आवाहन केले.
देशमुख म्हणाले, “विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रयत्नशील राहावे. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आत्मविश्वास, चिकाटी आणि परिश्रम या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. कोणत्याही क्षेत्रातील शिखर गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे सचिव अशोक बाफना होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “डिजिटल साधने ही ज्ञानाचे भांडार आहेत. विद्यार्थ्यांनी या साधनांचा सदुपयोग करून अभ्यासात प्रगती साधावी.”
या वेळी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम असवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, संचालक प्रल्हाद जांभुळकर, राजेश बाफना, चंद्रकांत ढोरे, प्रा. डॉ. शितल शिंदे, डॉ. जया धावरे, योगेश जाधव, प्रियंका पाटील, प्रणिता सूर्यवंशी, अनिल कोंद्रे, प्रा. केंगले, प्रा. ठाकरे, प्रा. ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिणी चंदनशिवे यांनी केले. प्राचार्य अशोक गायकवाड यांनी प्रस्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. महादेव वाघमारे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन डॉ. शितल दुर्गाडे यांनी मानले.
(प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे) ९९२१८०७०११



















