Homeमहत्त्वाचेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पाटस येथील कार्यक्रमस्थळाची प्रशासनाकडून पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पाटस येथील कार्यक्रमस्थळाची प्रशासनाकडून पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पाटस येथील कार्यक्रमस्थळाची प्रशासनाकडून पाहणी

यवत : विशेष प्रतिनिधी

ग्रामविकास विभागाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौंड तालुका दौरा निश्चित झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाटस (ता. दौंड) येथे निश्चित करण्यात आलेल्या मुख्य कार्यक्रमस्थळाची पाहणी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी केली.

या पाहणीसाठी दौंडचे आमदार राहुल कुल, विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, प्रांताधिकारी रेवणनाथ लबडे, तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी अरुण मळभर, यवत पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, दौंड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या पाहणीदरम्यान सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना, पार्किंग व्यवस्था, कार्यक्रमस्थळाची रचना तसेच नागरिकांसाठी पाणी, स्वच्छता, बसण्याची सोय, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा अशा विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पंतप्रधानांचा दौरा सुरळीत आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. पोलीस यंत्रणेने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्राथमिक आराखडा तयार केला असून, कार्यक्रमस्थळावरील नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच विविध विभागांना जबाबदाऱ्या देण्यात येत असून, पाटस व परिसरात स्वच्छता, रस्त्यांची डागडुजी व वीजपुरवठ्याची कामे तातडीने सुरू करण्यात आली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे दौंड तालुक्यातील हा ऐतिहासिक कार्यक्रम हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!