तळेगावातील इंद्रायणी महाविद्यालयात विद्यार्थ्यां ना स्पर्धा परीक्षा बाबत तज्ञांकडून मार्गदर्शन
तळेगाव दाभाडे : शहरातील नामांकित शिक्षण संस्था इंद्रायणी विद्यामंदिर व जिज्ञासा एक्स लन्स अकॅडमी प्रशिक्षण संस्थेच्या वतीने मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी व मार्गदर्शन वर्गाचे आयोजन १२जुन २०२५ रोजी करण्यात आले या संदर्भात माहिती देण्यासाठी दोन्ही संस्थेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डाॅ संभाजी मलघे, व जिज्ञासा अकॅडमी चे संचालक सुधीर राऊत यांनी या संदर्भात माहिती दिली. यावेळी बोलताना कार्यवाह चंद्रकांत शेटे म्हणाले की स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंद्रायणी महाविद्यालय परिसरात आधुनिक डिजिटल सुविधांनी युक्त क्लासरूम, कॉम्प्युटर लॅब.,संदर्भ ग्रंथ आणि नियतकालकांनी परिपूर्ण असलेले वाचनालय इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेने उपलब्ध करून दिले आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिज्ञासा एक्स लन्स अकॅडमी अनुभवी शासकीय अधिकारी आणि प्राध्यापक उपलब्ध करून देणार आहे. तसेच यासंदर्भात बोलताना प्राचार्य डाॅ संभाजी मलघे यांनी सांगितले की केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा साठी तयारी करून घेतली जाईलच. शिवाय बँकिंग, स्टाफ सिलेक्शन, कमिशन आणि रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड यांच्याद्वारे देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
दर आठवड्याला विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा देखील घेतल्या जातील जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी नियमित सराव होईल. जिज्ञासा अकॅडमीचे संचालक सुधीर राऊत यांनी सांगितले की अलीकडच्या काळात स्टाफ सिलेक्शन. कमिशन आणि आय बी पी एस द्वारे अनुक्रमे २४०० आणि ४००० एवढ्या अधिकारी व कर्मचारी तसेच अप्रेटिस यांच्या जागा भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत.
त्याचप्रमाणे विविध राष्ट्रीयकृत बँका. इन्शुरन्स कंपनी. रिझर्व बँक ऑफ इंडिया.आणि रेल्वेतील बिगर तांत्रिक पदासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल त्यांची संपूर्ण तयारी करून घेण्यात येणार आहे. यासाठी इंद्रायणी महाविद्यालयाच्या अनुभवी प्राध्यापक वर्ग इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डाॅ संभाजी मलघे यांचे सहकार्य लाभले आहे.
प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११




















