Homeमहत्त्वाचेतळेगाव दाभाडे पोलिसांचा दिमाखदार रूट मार्च

तळेगाव दाभाडे पोलिसांचा दिमाखदार रूट मार्च

तळेगाव दाभाडे पोलिसांचा दिमाखदार रूट मार्च

तळेगाव दाभाडे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तळेगाव दाभाडे पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार, दि. २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता तळेगाव दाभाडे पोलिसांकडून शहरात दिमाखदार रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.

या रूट मार्चमध्ये तळेगाव दाभाडे पोलिसांबरोबर राज्य राखीव दल (SRPF) तसेच होमगार्ड यांनी सहभाग घेतला. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा ठोस संदेश देण्यासाठी आणि नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून अतिरिक्त बंदोबस्त मागवण्यात आला आहे.

रूट मार्चची सुरुवात आणि मार्ग

शहरातील मारुती मंदिर चौक येथून रूट मार्चला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणुकीच्या स्वरूपात पोलिसांनी शक्तीप्रदर्शन करत नागरिकांशी संवाद साधला. या वेळी नागरिकांना उत्सव काळात सुरक्षेची हमी दिली गेली.

रूट मार्चचा मुख्य उद्देश –

नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे,

गुन्हेगार व असामाजिक घटकांना धाक दाखविणे,

गणेशोत्सव काळात शांतता आणि सुव्यवस्था राखणे हा होता.

नेतृत्व व मार्गदर्शन

हा रूट मार्च देहूरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

पोलिसांचे आवाहन

या वेळी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की –

गणेशोत्सव आनंदात, सुरक्षिततेत आणि शांततेत साजरा करावा.

कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.

संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे.

पोलीस प्रशासनाचे यावेळी स्पष्ट म्हणणे होते की, संपूर्ण गणेशोत्सव काळात शहर व परिसरात कडक नजर ठेवली जाणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस सज्ज आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी नागरिकांना कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

(प्रतिनिधी: गणेश नामदेव भेगडे ९९२१८०७०११):

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!