Homeसामाजिकनऊलाख उंब्रे गावात प्रशांत दादा भागवत यांच्या गणेशोत्सव भेटी दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

नऊलाख उंब्रे गावात प्रशांत दादा भागवत यांच्या गणेशोत्सव भेटी दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

नऊलाख उंब्रे गावात प्रशांत दादा भागवत यांच्या गणेशोत्सव भेटी दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

नऊलाख उंब्रे (मावळ) : आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंच व जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार प्रशांत दादा भागवत यांच्या नेतृत्वाखाली नऊलाख उंब्रे परिसरातील विविध गणेश मंडळांना भेट देण्यात आली. या दौऱ्याला गावकरी, महिला व युवक यांनी प्रचंड उत्साहाने प्रतिसाद दिला. दादांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या भेटी दौऱ्यात विशेष आकर्षण ठरले ते कांगाई तरुण मंडळाने केलेले साकडे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणरायाच्या चरणी दादांच्या उज्ज्वल राजकीय भवितव्यासाठी प्रार्थना केली. गावोगावी निर्माण झालेली दादांवरील जनआस्था, कार्यकर्त्यांशी घट्ट असलेली नाळ आणि सर्व घटकांना एकत्र घेऊन चालण्याची त्यांची दृष्टी यामुळे त्यांच्या नेतृत्वाला सर्व स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले.

दौऱ्यात जाधववाडीतील जय हनुमान तरुण मंडळ, बधलवाडीतील हनुमान तरुण मित्र मंडळ, मुक्ताई मित्र मंडळ, भैरवनाथ मित्र मंडळ, बोधलेबुवा मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ, जय गणेश मित्र मंडळ, सिद्धीविनायक मित्र मंडळ, तर मिंडेवाडीतील छत्रपती मित्र मंडळ, कांगाई देवी मित्र मंडळ, जय गणेश मित्र मंडळ, तसेच परिटवाडी व नऊलाख उंब्रे येथील जय हनुमान मित्र मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, दत्तकृपा तरुण मंडळ, शिव साम्राज्य तरुण मंडळ, जय गणेश मित्र मंडळ, भोलेनाथ मित्र मंडळ, भैरवनाथ मित्र मंडळ, काल भैरवनाथ मित्र मंडळ, जय हनुमान मित्र मंडळ, चावसर मित्र मंडळ अशा अनेक मंडळांना दादांनी भेट दिली.

या दौऱ्यात प्रशांत दादा भागवत यांच्यासोबत युवा मंचचे कार्यकर्ते रवी कडलक, नवनाथ पडवळ, बळीराम मराठे, नंदकुमार भागवत, राजू कडलक, गणेश शिंदे यांच्यासह असंख्य युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर प्रमुख मान्यवरांमध्ये माऊली उडाफे, विशाल घोलप, गौरव शेटे, उमेश कदम, काबू पवळे, मोहन दरेकर, माऊली दळवी, संतोष उडाफे, अरविंद बधाले, राजू बधाले, बंटी नरवडे, वेदांत उडाफे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

स्थानिक कार्यकर्त्यांनी या दौऱ्यादरम्यान स्पष्ट शब्दांत मत व्यक्त केले की – “जिल्हा परिषद निवडणुकीत प्रशांत दादा भागवत हे सक्षम, तरुण व सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. गावोगावचे प्रश्न सोडवण्याची क्षमता आणि विकासाला गती देण्याची दृष्टी दादांकडे आहे. त्यामुळेच गावकऱ्यांचा विश्वास त्यांच्या पाठीशी उभा आहे.”

गणेशोत्सवासारख्या श्रद्धा, ऐक्य आणि सामाजिक सलोख्याच्या पर्वावर झालेला हा दौरा प्रशांत दादा भागवत यांच्या वाढत्या लोकप्रियतेचे आणि जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचे प्रतीक ठरला आहे. मावळ तालुक्यातील राजकारणात एक सक्षम, तडफदार व विकासाभिमुख नेतृत्व म्हणून दादा पुढे सरसावत असून, जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!