Homeमहत्त्वाचेनिवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर तळेगावात वाहतूक मार्गात बदल

निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर तळेगावात वाहतूक मार्गात बदल

निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर तळेगावात वाहतूक मार्गात बदल

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दि. २१ डिसेंबर रोजी तळेगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आल्याची माहिती तळेगाव दाभाडे शहर वाहतूक पोलीस .सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोंढे यांनी दिली आहे.निकालाच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे बदल लागू करण्यात आले आहेत.

जिजामाता चौक ते तळेगाव स्टेशन चौक आणि तळेगाव स्टेशन चौक ते जिजामाता चौक या दोन्ही मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहतुकीस पूर्णतः प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांनी जिजामाता चौक येथून खांडगे पेट्रोल पंप, बेटी बचाओ सर्कल, राज मेडिकल चौक, मारुती मंदिर चौक असा पर्यायी मार्ग वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. स्टेशन चौकाकडून जाणाऱ्यांनी बीएसएनएल कॉर्नर, मंत्रा सिटी रोड, स्टार बाजार कॉर्नर, जुना मुंबई–पुणे महामार्ग व लिंब फाटा चौक मार्गे प्रवास करावा.

काळोखेवाडी ते नगरपरिषदेची नवीन इमारत तसेच आदर्श विद्यालय गेट ते नगरपरिषदेची नवीन इमारत या मार्गांवरही सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. या भागातील वाहनचालकांनी वक्रतुंड बंगला कॉर्नर, आरोग्य आयुर्वेदिक क्लिनिक, बेटी बचाओ सर्कल किंवा श्रीनगरि कॉर्नर, हॉटेल ईशा कॉर्नर, जिजामाता चौक तसेच खांडगे पेट्रोल पंप मार्गे पर्यायी रस्ते वापरावेत.

वतननगर बाजूकडून हिंदमाता भुयारी मार्ग ते काका हलवाई कॉर्नर हा मार्गदेखील वाहतुकीस बंद राहणार आहे. या ठिकाणी स्वप्ननगरी जनसेवा वाचनालय, चाकण–तळेगाव महामार्ग, मराठा क्रांती चौक व तळेगाव स्टेशन चौक असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

वाहतूक पोलिसांनी नागरिक, वाहनचालक व प्रवाशांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!