Homeसामाजिकनो पार्किंग क्षेत्र उरले नावालाच नो पार्किंगच्या फलकाखाली वाहने पार्क. पोलिसांचे दुर्लक्ष 

नो पार्किंग क्षेत्र उरले नावालाच नो पार्किंगच्या फलकाखाली वाहने पार्क. पोलिसांचे दुर्लक्ष 

तळेगाव दाभाडे : शहरातील स्टेशन परिसरातील मुख्य वर्दळीचा रस्ता असणारा मार्ग तळेगाव जनरल हॉस्पिटल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर रेल्वे स्टेशन बाहेर नो पार्किंग फलक लावण्यात आला असून नागरिकांकडून नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे. चक्क नो पार्किंग फलका खालीच वाहने पार्क केलेली दिसत आहे.

यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे. तळेगाव रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी व येण्यासाठी याच मार्गाचा वापर होत असतो. रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाणाऱ्या प्रवेशद्वारासमोरच दुचाकी व चार चाकी वाहने पार्क केली जात आहे. अशा वाहनांमुळे प्रवाशांना व येथून जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

१० मीटर अंतरावर अधिकृत पार्किंग स्टॅन्ड असून देखील अनेक नागरिक बिनधास्त पणे नो पार्किंगच्या फलका जवळच वाहने पार्क करून निघून जातात. या बेशिस्त वाहन लावणाऱ्या नागरिकांमुळे हा रस्ता अरुंद झाला असून या रस्त्याने दोन्ही बाजूने जाणाऱ्या वाहनांना अडचणी निर्माण होत आहे.

अनाधिकृतपणे पार्क केलेल्या वाहनांवर प्रशासन तसेच वाहतूक पोलीस लक्ष देत नाही नो पार्किंग क्षेत्राचे फलक नावालाच लावले की काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. नो पार्किंगच्या क्षेत्रामध्ये वाहने उभी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी शहरातील अनेक नागरिकांनी केली आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!