Homeसामाजिकमावळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी युवा सेनेकडून करण्यात आली असून...

मावळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी युवा सेनेकडून करण्यात आली असून तहसीलदारांना या संदर्भात निवेदन देण्यात आले

वडगाव मावळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेकडून मावळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात युवा सेनेने मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नुकतीच खरीपाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून खरीप भात पेरणी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा. उडीद, फरसबी, मूग आदी पिकांची पेरणी केली तर काहींनी पारंपारिक बैल जोडी सह तर काहीजणांनी ट्रॅक्टर च्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात काम केले. यादरम्यान १५ मे २५ जून या कालावधीमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे. मावळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे निवेदन तहसीलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले आहे.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी भारत ठाकूर, उमेश गावडे, युवराज सुतार, नितीन पिंगळे, संतोष ढोरे, रवींद्र गायकवाड, पोपट राक्षे, राहुल नखाते, प्रदीप सातपुते, भरत वाटाणे, समीर घारे, अभिषेक काळोखे उपस्थित होते.

तरी प्रशासनाने तत्काळ मावळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!