Homeउद्योगपोल्ट्री व्यवसायिकांच्या मागण्यांसाठी विशेष प्रयत्न करणार.माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचे...

पोल्ट्री व्यवसायिकांच्या मागण्यांसाठी विशेष प्रयत्न करणार.माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचे आश्वासन

पोल्ट्री व्यवसायिकांच्या मागण्यांसाठी विशेष प्रयत्न करणार.माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचे आश्वासन

तळेगाव दाभाडे : महाराष्ट्र राज्यातील पोल्ट्री व्यवसायिकांच्या शासन दरबारी प्रलंबित मागण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहे असे आश्वासन माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

पोल्ट्री संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची भेट घेऊन पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित विविध प्रलंबित मागण्याबाबत सविस्तर चर्चा केली. शिष्टमंडळाने केंद्र शासनाने पोल्ट्री व्यवसायिकांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वे राज्यात प्रभावीपणे लागू करण्यात यावी. पोल्ट्री शेड वरील घरपट्टी माफ करण्यात यावी. पोल्ट्री व्यवसायाचा समावेश शेती व्यवसायात करावा. पोल्ट्री साठी आकारण्यात येणाऱ्या विजेच्या दराची गणना शेतीपंपाप्रमाणे करण्यात यावी आणि पोल्ट्री व्यवसायिकांना अनुदान तत्वावर सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात यावेत अशा विविध मागण्यांची माहिती यावेळी बाळा भेगडे यांना पोल्ट्री संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

या मागण्यासंदर्भात बोलताना माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले की राज्यातील पोल्ट्री व्यवसायाला चालना मिळावी यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री. ग्रामविकास मंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करीन असे आश्वासन बाळा भेगडे यांनी दिले.

या भेटीचे आयोजन नियोजन व प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार. महाराष्ट्र राज्य पोल्ट्री संघटनेचे संघटक सोनबा गोपाळे( गुरुजी), अध्यक्ष एकनाथराव टिळे, कार्याध्यक्ष सुभाष केदारी यांनी केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल खामकर, विलासराव साळवी, संघटक सोनबा गोपाळे( गुरुजी) तालुकाध्यक्ष एकनाथराव गाडे, कार्याध्यक्ष सुभाष केदारी, उपाध्यक्ष संतोष घारे तसेच संभाजी केदारी, बाबाजी पाठारे, दिनेश जाधव, मल्हारी ढोरे, संभाजी शिंदे, दत्तात्रय निम्हण, आदी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!