Homeशिक्षण-प्रशिक्षणफी साठी विद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या शाळेला लोणावळा मनसेने दिला दणका

फी साठी विद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या शाळेला लोणावळा मनसेने दिला दणका

फी साठी विद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या शाळेला लोणावळा मनसेने दिला दणका

लोणावळा : शहरातील किंग्स वे या शाळेने तीन मुलांच्या शाळेच्या दाखला ५३.००० रुपये फी बाकी असल्याने देत नाही अशा स्वरूपाची तक्रार मनसे लोणावळा शहराध्यक्ष निखिल हनुमंत भोसले यांना मिळतात त्यांनी आपल्या मनसे पदाधिकाऱ्यांसह शाळेला दणका दिला.

लोणावळा मनसे शहराध्यक्ष निखिल भोसले यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की मनसे लोणावळा शहर यांच्या वतीने दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट वायरल करण्यात आली होती. त्या पोस्टमध्ये सांगण्यात आले होते की लोणावळ्यातील कोणतीही शाळा विद्यार्थ्यांची फी साठी अडवणूक करत असेल तर त्या शाळेला मनसेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

ही पोस्ट वाचून लोणावळा शहरालगत असलेल्या कुसगाव बुद्रुक येथील जगन्नाथ कांबळे यांनी लोणावळा मनसे शहराध्यक्ष निखिल भोसले यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली की किंग्स वे या शाळेने माझ्या तीन मुलांना शाळेचा दाखला ५३.००० रुपये फी बाकी असल्याने दिला नाही. ही माहिती मिळताच निखिल भोसले यांनी अधिक माहिती घेतल्यानंतर सदरची शाळा ही परवानगी नसल्याकारणाने बंद केली गेली आहे.

त्यामुळे दुसऱ्या शाळेत विद्यार्थ्यांचे अॅडमिशन करण्यासाठी शाळेने फि न भरल्या कारणाने सदरील तिन्ही मुलांचे दाखला व गुणपत्रिका शाळेने अडवून ठेवले आहे. मुलांचे पालक जगन्नाथ कांबळे यांची सध्याची परिस्थिती बिकट असल्याकारणाने ते खरंच शाळेची फी करू शकत नाही असे मनसे अध्यक्ष निखिल भोसले यांना आढळून आल्याने त्यांनी जगन्नाथ कांबळे व त्यांच्या मुलांना सोबत घेऊन किंग्स वे शाळेवरती धडक दिली व तीनही विद्यार्थी वैभवी कांबळे इयत्ता दहावी, साक्षी कांबळे इयत्ता सहावी, आदित्य कांबळे इयत्ता चौथी या विद्यार्थ्यांचे दाखले पालक जगन्नाथ कांबळे त्यांना मिळवून दिले.

यावेळी लोणावळा मनसे शहराध्यक्ष निखिल हनुमंत भोसले, मनसे प्रवक्ते अमित भोसले, मनसे पदाधिकारी संदीप बोभाटे, सुनील सोनवणे, सुभाष रेड्डी, जुबेर मुल्ला, आकाश सावंत, कैवल्य जोशी, नरेश महामुनी आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तरी लोणावळा शहरातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर यांनी आवाहन केले आहे की अशा कुठल्याही शाळेने फी भरली नसल्याकारणाने विद्यार्थ्यांची अडवणूक करत असेल तर पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावा.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!