Homeताज्या बातम्याबनावट वेबसाईट्स आणि फसव्या ॲप्सपासून सावध रहा; पिंपरी-चिंचवड आरटीओचे नागरिकांना आवाहन

बनावट वेबसाईट्स आणि फसव्या ॲप्सपासून सावध रहा; पिंपरी-चिंचवड आरटीओचे नागरिकांना आवाहन

बनावट वेबसाईट्स आणि फसव्या ॲप्सपासून सावध रहा; पिंपरी-चिंचवड आरटीओचे नागरिकांना आवाहन

पिंपरी-चिंचवड : वाहन परवाना, वाहन नोंदणी, ई-चलन यांसारख्या महत्त्वाच्या परिवहन सेवांच्या नावाखाली सुरू असलेल्या बनावट वेबसाईट्स, फसवे मोबाईल ॲप्स आणि दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. खोट्या लिंकच्या माध्यमातून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असून, या प्रकारांमुळे वाहनचालक व वाहनमालकांची आर्थिक हानी होत आहे. त्याचबरोबर वैयक्तिक माहिती चोरीला जाऊन तिचा गैरवापर होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

पिंपरी-चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वाहन परवाना आणि संबंधित सेवांसाठी ‘सारथी’सह अधिकृत संकेतस्थळे उपलब्ध असून, त्याव्यतिरिक्त डाॅट काॅम.डाॅट आॅनलाईन.डाॅट साईट.डाॅट ईन.अशा इतर डोमेनवरील वेबसाईट्स उघडण्याचे टाळावे, असे त्यांनी स्पष्ट केले. अशा बनावट वेबसाईट्सवरून माहिती भरल्यास आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते.

फसवणूक करणारे “तुमचे चलन बाकी आहे, तत्काळ दंड भरा” अशा स्वरूपाचे संदेश पाठवून नागरिकांना अनधिकृत लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडतात. या लिंकवर क्लिक केल्यास मोबाईलमधील वैयक्तिक माहिती, बँक तपशील किंवा ओटीपी चोरीला जाण्याचा धोका निर्माण होतो. विशेष म्हणजे, प्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा परिवहन विभागाकडून कधीही व्हॉट्सॲपद्वारे पेमेंटसाठी लिंक पाठवली जात नाही, असेही संदेश चव्हाण यांनी ठामपणे सांगितले.

नागरिकांनी कोणताही संदेश, ई-मेल किंवा लिंक तपासणीशिवाय उघडू नये. शंका असल्यास अधिकृत परिवहन संकेतस्थळ किंवा जवळच्या आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही आरटीओ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!