माजी जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर व १० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ
तळेगाव दाभाडे : तेली कार्यालय ट्रस्ट व तेली समाज गणेशोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे नगरीचे सुपुत्र मुंबई शहर उपनगराचे माजी जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर व तेली समाजातील १०वी १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी अप्पर जिल्हाधिकारी राजेश कुलकर्णी, माजी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, श्रीमती मीराताई फल्ले, तेली समाज ट्रस्टचे विश्वस्त देवेंद्र बारमुख, अध्यक्ष बाळकृष्ण क्षीरसाग,. राजेश राऊत, सुदुंबरे तेली संस्थांचे विश्वस्त प्रशांत भागवत हे या कार्यक्रमास उपस्थित होते.
माजी प्राध्यापिका मनीषा पिंगळे यांनी संयोजकांच्या वतीने राजेंद्र क्षीरसागर(I A S अधिकारी) यांच्या मानपत्राचे वाचन करून त्यांचे महसूल खात्यातील सेवानुभव मांडले मानपत्र प्रदान करून विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह गौरविण्यात आले. राजेंद्र क्षीरसागर यांनी त्यांच्या सन्मानप्रित्यर्थ कृतज्ञता व्यक्त करून विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाचे योग्य संगतीचे शिस्तीचे महत्व पटवून दिले.
त्यांनी तळेगाव दाभाडे शहरातील तेली आळीतील जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. भविष्यात तेली समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज आधुनिक स्वरूपातील अभ्यासिका उभारण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळकृष्ण क्षीरसागर, संजय कसाबी, संदीप जगनाडे, वैभव कोतुळकर, रणजीत पिंगळे, तुषार जगनाडे, गोकुळ किरवे, शैलेश मखामले, सतीश खोंड, दिनेश कसाबी आदी सह तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर टेकवडे, महेंद्र(बाळा) कसाबी, विजय केदारी, सुजित लोखंडे, अजय शेलार, राजू जगनाडे, अतुल जगनाडे, संजय बारमुख, स्वप्निल बारमुख, निलेश बारमुख यांनी विशेष मेहनत घेतली.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















