Homeमहत्त्वाचेमाती वाहतुकीचा उन्माद! नाणे गावातील रस्ते मृत्यूच्या सापळ्यात, नागरिकांचे हाल

माती वाहतुकीचा उन्माद! नाणे गावातील रस्ते मृत्यूच्या सापळ्यात, नागरिकांचे हाल

माती वाहतुकीचा उन्माद! नाणे गावातील रस्ते मृत्यूच्या सापळ्यात, नागरिकांचे हाल

कामशेत : मावळ तालुक्यातील नाणे गावात माती वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू असून, यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भरधाव वेगाने गावातून ये-जा करणाऱ्या या गाड्यांमुळे रस्त्यांवर सर्वत्र माती साचली असून, संपूर्ण परिसर अपघातप्रवण बनला आहे. गावातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही मातीचा थर पसरल्याने रस्ते घसरडे झाले असून, वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरत आहे. रस्त्यावर पडलेल्या मातीमुळे अनेक वेळा वाहनांचे संतुलन बिघडत असून, अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. प्रशासन मात्र अद्याप मौन बाळगून असल्याचे चित्र आहे. शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि पादचारी यांना या मातीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, माती वाहतूक करणाऱ्या गाड्या बेकायदेशीरपणे माती चोरी करून नेत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. परवानगीशिवाय माती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याने शासनाच्या नियमांना सर्रास पायदळी तुडवले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. गाड्यांवर कोणतेही संरक्षण कवच नसल्याने माती रस्त्यावर पडत असून धुळीचे लोट हवेत पसरत आहेत.

याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे. उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ, सर्दी-खोकल्याचे प्रमाण वाढले आहे. “रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन माती वाहतुकीवर कठोर नियंत्रण आणावे, दोषींवर कारवाई करावी तसेच रस्त्यांची त्वरित स्वच्छता करावी, अशी जोरदार मागणी नाणे गावातील संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!