Homeमहत्त्वाचेमावळच्या डोंगरमाथ्यावर पवनचक्क्यांचा गोंगाट; वन्यजीवांची मानवी वस्तीकडे धाव

मावळच्या डोंगरमाथ्यावर पवनचक्क्यांचा गोंगाट; वन्यजीवांची मानवी वस्तीकडे धाव

मावळच्या डोंगरमाथ्यावर पवनचक्क्यांचा गोंगाट; वन्यजीवांची मानवी वस्तीकडे धाव

मावळ : मावळ तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये डोंगरमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आलेल्या पवनचक्क्यांमुळे परिसरातील जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. पवनचक्क्यांच्या सातत्यपूर्ण आणि तीव्र आवाजामुळे जंगलातील वन्यप्राणी भयभीत होऊन मानवी वस्तीकडे स्थलांतर करू लागले आहेत. याचा थेट परिणाम मानवी जीवनावरही होत असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

डोंगराळ भागात पूर्वी मुबलक प्रमाणात आढळणारे हरण, ससे, रानडुक्कर यांसारखे प्राणी पवनचक्क्यांच्या आवाजामुळे जंगल सोडून इतरत्र पळ काढत आहेत. परिणामी, बिबट्यासारख्या मांसाहारी प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अन्नसाखळीत अडथळा निर्माण झाला आहे. जंगलात अन्नभक्षक उपलब्ध नसल्याने बिबटेही त्यांच्या पाठोपाठ मानवी वस्तीत शिरकाव करू लागले आहेत. गेल्या काही महिन्यांत मावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्या दर्शनाच्या घटना वाढल्या असून, काही ठिकाणी पाळीव जनावरांवर हल्ल्याचे प्रकारही घडले आहेत.

वन्यप्राण्यांना शांतता आणि नैसर्गिक अधिवास आवश्यक असतो. मात्र पवनचक्क्यांमधून निर्माण होणारा सततचा गोंगाट, कंपन यामुळे प्राणी गोंधळून जातात. बिबट्या असो वा अन्य वन्यप्राणी, या सर्वांना आवाजाचा त्रास सहन होत नाही. पवनचक्क्यांचा आवाज तुलनेने अधिक तीव्र आणि अखंड असल्याने वन्यजीवांच्या वर्तणुकीत बदल होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ग्रामीण भागामध्ये ज्या डोंगर माथ्यावरती पवनचक्की बसवल्या आहेत त्या डोंगर पायथ्याशी असणारी शेती वन्य प्राणी पूर्णपणे येऊन नष्ट करत आहेत त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती करण्याचे सोडून दिले आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून, पवनचक्क्या उभारताना पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास व्हावा, अशी मागणी होत आहे. वनविभागानेही परिस्थितीची दखल घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात, जेणेकरून वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास सुरक्षित राहतील आणि मानवी वस्तीवर येणारा धोका कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!