Homeसामाजिकमावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाची मासिक बैठक उत्साहात संपन्न

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाची मासिक बैठक उत्साहात संपन्न

मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाची मासिक बैठक उत्साहात संपन्न

कामशेत (ता. मावळ) : मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाची मासिक बैठक रविवार (दि. १२ ऑक्टोबर) रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, कामशेत येथे अत्यंत भक्तिभावाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडली. या बैठकीला मंडळाचे विविध पदाधिकारी, वारकरी बांधव आणि महिला वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीचे आयोजन आणि नियोजन हे कामशेत शहराध्यक्ष ह.भ.प. शंकर महाराज खेंगले यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचे पूजन व पुष्पहार अर्पण करून बैठकीचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर सुरेख भजनसेवेने वातावरण दुमदुमले.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते ह.भ.प. माऊलीमामा शिंदे हे होते. प्रारंभी मंडळाचे विश्वस्त ह.भ.प. बजरंग महाराज घारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर प्रास्ताविक सचिव ह.भ.प. रामदास गणपत पडवळ यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात ह.भ.प. माऊली शिंदे यांनी मंडळाच्या सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचे कौतुक करत मंडळाच्या सातत्यपूर्ण कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

यानंतर मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष ह.भ.प. नंदकुमार महाराज भसे यांनी वारकरी बांधवांना मार्गदर्शन केले. त्यांनी मंडळाच्या चालू उपक्रमांबरोबरच भविष्यातील नियोजनाबद्दलही माहिती दिली. कार्याध्यक्ष ह.भ.प. संतोष कुंभार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी रूडसेट संस्थातर्फे तरुण वारकऱ्यांसाठी स्वंयरोजगाराच्या संधींबाबत विभाग प्रमुख ह.भ.प. शिवाजीराव बोडके यांनी माहिती दिली आणि इच्छुक युवकांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मंडळाच्या वतीने आळंदी कार्तिकी पायी वारी निमित्त कोकण विभागातून येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा जांभूळ फाटा येथे सन्मान व अल्पोपहाराचा कार्यक्रम १३, १४ आणि १५ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. या महत्त्वाच्या कार्यक्रमाचे नियोजनही बैठकीत करण्यात आले.

मंडळाच्या कार्याची दखल घेत ह.भ.प. शिवाजी तरस, ह.भ.प. साहेबराव देशमुख, आणि ह.भ.प. शिवाजी शिरसट या वारकऱ्यांना मंडळाचे नवे सभासद म्हणून स्वागत करण्यात आले. त्यांचा सत्कारही यावेळी झाला.

बैठकीच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व उपस्थितांनी ह.भ.प. शंकर महाराज खेंगले यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. बैठकीचा समारोप पसायदानाने करण्यात आला. सूत्रसंचालन ह.भ.प. गोपिचंद महाराज कचरे यांनी तर आभारप्रदर्शन मंडळाचे उपाध्यक्ष ह.भ.प. दिलीप वावरे यांनी केले.

या बैठकीसाठी मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन आडिवळे सर, बालवारकरी समिती अध्यक्ष काशिनाथ सातकर, आंदर मावळ विभागीय अध्यक्ष दिपक रावजी वारिंगे, तसेच गोविंद सावले, महादुबुवा वाटाणे, पंढरीनाथ वायकर, साईनाथ राऊत, बाळासाहेब देशमुख, चंद्रकांत सातकर, अभिमन्यू शिंदे, दशरथ काळे, सूर्यकांत दांगट, बंडू कदम, विजय गायखे, सोमनाथ महाराज सातपुते, संजय महाराज बांदल, भाऊसाहेब थरकुडे, बारकू खांदवे, सदाशिव पेटकर, दशरथ कदम यांसह अनेक वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!