Homeसामाजिकलोणावळा शहर भाजपाच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

लोणावळा शहर भाजपाच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

लोणावळा शहर भाजपाच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

लोणावळा शहर भारतीय जनता पार्टी व देविदास कडू युवा मंच यांच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. लोणावळा शहर व परिसरामधील विशेष गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा या सोहळ्यामध्ये सत्कार सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना लोणावळा भाजपाचे गटनेते व माजी नगरसेवक देविदास कडू म्हणाले आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही कायम तत्पर राहू.

विद्यार्थ्यांना मिळालेले हे यश हे त्यांच्यासोबत त्यांचे आई-वडील गुरुजन व नातेवाईक या सर्वांचे यश आहे त्यामुळे हे सर्वजण कौतुकास पात्र आहेत. विद्यार्थ्यांनी भविष्यकाळामध्ये उत्तम अशा करिअरच्या संधी शोधत त्यामधून स्वतःचे व समाजाचे नेतृत्व करावे, स्पर्धा परीक्षांची कास धरावी असे सांगितले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या लोणावळा शहरातील व मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या रोख रकमेच्या योजना देखील जाहीर केल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेमध्ये येत आपल्या शहराचे व तालुक्याचे नेतृत्व करावे असा संदेश त्यांनी या गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना व पालकांना दिला आहे.

लोणावळा शहर भारतीय जनता पार्टी व देविदास कडू युवा मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कवीश्वर, भाजपाचे गटनेते देविदास कडू, माजी शहर अध्यक्ष अरुण लाड, राजेंद्र चौहान, बाबा शेट्टी, दादा धुमाळ, ज्येष्ठ नेते सुभाष सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोणावळा शहराध्यक्ष विलास बडेकर, मनसेचे लोणावळा शहराध्यक्ष निखिल भोसले, शिवसेना लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, सुधीर पारिठे, संतोष गुप्ता, जितेंद्र राऊत, ॲड. अविनाश पवार, माजी नगरसेविका ब्रिंदा गणात्रा, अर्पणा बुटाला, जयश्री आहेर, मंदा सोनवणे, सुषमा देविदास कडू, अश्विनी जगदाळे, अरुण जोशी, पांडुरंग तिखे, दत्तात्रेय तांदळे, दीपक कांबळे, राजू परदेशी, जयप्रकाश परदेशी, प्रथमेश पाळेकर, शुभम मानकामे, सुनील भाऊ खिल्लारे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!