Homeक्राईमलोणावळ्यातील टॅक्सीचालकानी बाहेरून आलेल्या ओला–उबेर चालकाला केली मारहाण. मारहाण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी...

लोणावळ्यातील टॅक्सीचालकानी बाहेरून आलेल्या ओला–उबेर चालकाला केली मारहाण. मारहाण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

लोणावळ्यातील टॅक्सीचालकानी बाहेरून आलेल्या ओला–उबेर चालकाला केली मारहाण. मारहाण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

लोनावळा:वरसोली टोलनाका परिसरात रविवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण लोणावळ्यात चांगलीच खळबळ उडाली. शहरात पर्यटकांना सोडण्यासाठी आलेल्या एका ओला–उबेर टॅक्सीचालकावर स्थानिक चालकाने संतापाच्या भरात हल्ला केला. यामध्ये चालकाला मारहाण करून त्याच्या गाडीवर दगडफेकही करण्यात आली. विशेष म्हणजे, संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ स्वतः आरोपीने मोबाईलमध्ये चित्रीत केल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रोहित रामकिसन गुप्ता याला ताब्यात घेत गुन्हा नोंदवला आहे.

नियमांनुसार लोणावळा शहरात ओला–उबेर टॅक्सीना स्थानिक प्रवासी उचलण्यास मनाई आहे. बाहेरून पर्यटकांना घेऊन येणारे चालक फक्त ड्रॉप करून परत जाण्यास मुभा असते. त्यानुसार संबंधित चालकाने पर्यटकांना सोडल्यानंतर वरसोली टोलनाक्याजवळील एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबा घेतला होता. याच वेळी आरोपी रोहित गुप्ता संतापाने हॉटेलमध्ये धडकला आणि “तू इथे का आला?” असा प्रश्न करत त्याने चालकाला शिवीगाळ व मारहाण केली. हाणामारीनंतर आरोपीने बाहेर येऊन टॅक्सीवर दगडफेक केली व वाहनाचे नुकसान केले.

या प्रकरणी तात्याराव भिकन सपकाळ यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी लगेच घटनास्थळाचे निरीक्षण करून आरोपीला ताब्यात घेतल्यामुळे तणाव वाढण्यापासून परिस्थिती नियंत्रणात आल्याचे सांगितले जाते.

लोणावळा–खंडाळा टॅक्सी असोसिएशनचे सल्लागार निखिल कवीश्वर यांनी या प्रकाराबद्दल प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की आरोपी रोहित गुप्ताचा त्यांच्या संघटनेशी काहीही संबंध नाही. “आमच्या असोसिएशनकडून अशा गैरप्रकारांना कधीच प्रोत्साहन दिले जात नाही,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनेश तायडे यांनी घटनेचा तीव्र निषेध करत परिसरातील सर्व चालकांना शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. “अशा प्रकारांना आळा बसला पाहिजे. आरोपीवर योग्य ती कारवाई केली असून तपास सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पर्यटन हंगामात अशा घटनांमुळे लोणावळ्याच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो, अशी स्थानिकांची प्रतिक्रिया आहे. सुरक्षित आणि सुयोग्य प्रवास व्यवस्थेसाठी पोलिस आणि प्रशासनाने अधिक कडक पावले उचलावीत, अशी मागणीही होत आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!