Homeक्राईमलोणावळ्यात खोट्या यूपीआय पेमेंटचा पर्दाफाश.नागरिकानी व व्यावसायिकांनी सायबर गुन्ह्यांपासुन सावध राहण्याचे पोलिसांनी...

लोणावळ्यात खोट्या यूपीआय पेमेंटचा पर्दाफाश.नागरिकानी व व्यावसायिकांनी सायबर गुन्ह्यांपासुन सावध राहण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे 

लोणावळ्यात खोट्या यूपीआय पेमेंटचा पर्दाफाश.नागरिकानी व व्यावसायिकांनी सायबर गुन्ह्यांपासुन सावध राहण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे 

लोणावळा : फसवणुकीचे वेगवगेळे फंडे वापरत हातचलाखी केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार बुधवारी (25 जून) दुपारी लोणावळ्यात उघडकीस आला. कुमार चौकातील एका दुकानात गर्दीच्या वेळी साहित्य खरेदी केल्यानंतर स्टुड पेटीएम नावाच्या एका ॲप मधून सादर भामट्याने दुकानदाराला पैसे पाठविले असल्याचा स्क्रीन शॉट मोबाईल वर दाखविला. मात्र दुकानदाराकडे पैसे आले नव्हते तसेच स्क्रीन शॉट च्या वरती जी वेळ दाखविण्यात आली होती.

त्यात तफावत असल्याने दुकानदाराला सदर व्यक्ती विषयी संशय आला. त्याने त्याला शेजारी असलेल्या कुमार पोलीस चौकी येथे आणले. मात्र त्यावेळी त्याने चुकीने असे झाले असल्याचे सांगत पुन्हा दुसऱ्या एका अकाउंट वरून थोडे पैसे पाठवत सदर प्रकरण हात चलाखीने बाहेरच्या बाहेर मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानदार व स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून पोलीस चौकीत आणले.

तेथे पोलीस हवालदार अनिल शिंदे यांनी हे फेक स्क्रीन शॉट कसे तयार केले त्याचे प्रात्यक्षिक करून पाहिले व त्याला तरुणाला पकडून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाहीसाठी पाठविले आहे. सदर युवक हा मुंबई भागातील आहे. त्याने यापूर्वी कुठे असे प्रकार केले आहेत का, याची देखील पोलीस चौकशी करत आहेत. सदर युवकाने त्याच्या मोबाईल मध्ये एक फेक ॲप ठेवले आहे. त्यावरून तो पैसे पाठवतो. प्रत्यक्षात पैसे जात नाहीत फक्त ट्रांजेक्शन झालेले दिसते. अशा प्रकारे तो फसवणूक करत होता. नागरिकांनी आणि व्यवसायिकांनी अशा खोट्या सायबर गुन्ह्यापासून सावध राहण्याचे आवाहन लोणावळा शहर पोलिसांनी केले आहे.

लोणावळा हे पर्यटन स्थळ आहे. येथे दररोज हजारो पर्यटक येत असतात. या गर्दीचा फायदा घेत काही भामटे डिजिटल पेमेंटच्या निमित्ताने दुकानदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे या प्रकारातून समोर आले आहे. गर्दीच्या वेळेस अनेक वेळा डिजिटल पेमेंट केले असल्याचे पाहून दुकानदार दुर्लक्ष करतात त्यामुळे अशा भामट्यांचे फावत आहे. मागील वर्षी अशाच प्रकारे मुंबई भागातील एका कुमार हॉटेल समोरील लोणावळा नगर परिषदेच्या फ्री पार्किंग मध्ये वाणे पार्क करून त्यांच्याकडून पार्किंगचे पैसे गोळा करत असताना रंगेहात पकडला होता. पर्यटन स्थळांवर गर्दीचा फायदा घेत अशा प्रकारे नागरिकांना व पर्यटकांना गंडा घालणारे भामटे बाहेर गावावरून येत लोणावळा शहराचे नाव खराब करत आहे.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे .९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!