वडगाव नगरपंचायतीकडून करदात्यांना दिलासा
मालमत्ता करावरील शास्ती माफी अभय योजनेस मुदतवाढ
वडगाव (ता. मावळ) : वडगाव शहरातील सर्व मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने दि. १९ मे २०२५ रोजी मालमत्ता करावरील शास्ती (दंडात्मक व्याज) माफीसाठी विशेष अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेअंतर्गत नगरपंचायतीमार्फत कर प्रस्ताव स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
नागरिकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद व मागणीच्या पार्श्वभूमीवर वडगाव नगरपंचायतीने या योजनेची मुदत वाढवून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत केली आहे.
नागरिकांसाठी सुवर्णसंधी
या योजनेनुसार, करदात्यांनी आपल्या मालमत्तेची २०२५-२६ पर्यंतची कर मागणीची रक्कम भरायची असून, कर थकबाकीवर लागणारी शास्ती (दंडात्मक व्याज) पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे करदात्यांना केवळ मूळ कर रक्कम भरून आपला थकबाकी खात्यातून वजा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
लोकहिताची योजना
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “या लोकहित योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आणि आपली कर थकबाकी त्वरित फेडून नगरपंचायतीच्या विकास कामात सहकार्य करावे.”
संपर्कासाठी माहिती
सिद्धेश्वर महाजन (कर निरीक्षक) : 8668430564
कर विभाग, नगरपंचायत कार्यालय वडगाव



















