Homeमहाराष्ट्रवडगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात व शांततेत पार

वडगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात व शांततेत पार

वडगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात व शांततेत पार

वडगाव (ता. मावळ) – वडगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मंगळवार (दि.२) रोजी मोठ्या भक्तीभावात, शिस्तबद्ध वातावरणात आणि उत्साहात पार पडली. घरगुती गौरी-गणपती बाप्पांचे विसर्जनही भक्तिमय वातावरणात करण्यात आले. ग्रामदैवत पोटोबा महाराज देवस्थान मानाचा पहिला गणपती आणि जय बजरंग तालीम मानाचा पहिला गणपती यांच्या विसर्जनापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर शहरातील सर्व गणेश मंडळांनी आपल्या गणरायाला ढोल-ताशांच्या गजरात, भक्तीगीतांच्या स्वरात आणि जोशपूर्ण जल्लोषात निरोप दिला.

मिरवणुकीत विविध गणेश मंडळांनी आकर्षक झांकी, सांस्कृतिक सादरीकरणे आणि पारंपरिक वाद्यांचा गजर करून वातावरण उत्साहवर्धक केले. जय जवान जय किसान मित्र मंडळाच्या ‘शिव तांडव’ या देखाव्याने नागरिकांना मंत्रमुग्ध केले, तर सिद्धिविनायक मित्र मंडळाने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भातील सजावट करून सामाजिक भान जागृत केले. या दोन्ही झांक्यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

याव्यतिरिक्त, सर्वच मंडळांनी आपल्या गणेशमूर्तींच्या सजावटीत आकर्षक रोषणाई, फुलांच्या आरास, तसेच देखाव्यांमधून सामाजिक व सांस्कृतिक संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. या सुंदर सजावटीमुळे संपूर्ण मिरवणूक दिमाखदार व रंगतदार ठरली.

मिरवणुकीच्या मार्गावर सर्वत्र रोषणाई, फुलांची सजावट व स्वागतद्वार उभारण्यात आले होते. ठिकठिकाणी विविध संघटनांनी स्वागत कक्ष उभारले होते. मोरया प्रतिष्ठान, वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टी, बजरंग दल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या वतीने भाविकांचे स्वागत करण्यात आले. तर गजानन मित्र मंडळ यांच्या वतीने वृक्ष वाटप करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. अशादीप कॉम्प्युटर यांच्या वतीने मिरवणुकीत सहभागी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.

महिला, युवक, लहान मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरात “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या घोषणांनी वडगाव शहर दुमदुमून गेले.

गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणताही अप्रिय प्रकार घडू नये यासाठी वडगाव पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरभर पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्था केली. वडगाव नगरपंचायत व महावितरणने मिरवणुकीदरम्यान सुरळीत वीजपुरवठा व स्वच्छतेची व्यवस्था केली.

शहरातील नागरिक, मंडळांचे कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे वडगाव गणेश विसर्जन मिरवणूक यशस्वीरीत्या व शांततेत पार पडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!