Homeताज्या बातम्यावडगाव शहरात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश यात्रेला भावपूर्ण प्रतिसाद

वडगाव शहरात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश यात्रेला भावपूर्ण प्रतिसाद

वडगाव शहरात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश यात्रेला भावपूर्ण प्रतिसाद

वडगाव मावळ : महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश यात्रेचे वडगाव शहरात आज भावनिक वातावरणात आगमन झाले. या यात्रेदरम्यान संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले होते. “दादा अमर राहोत”च्या घोषणांनी वडगाव शहर भारावून गेले.

अस्थिकलश यात्रा शहरात दाखल होताच मुख्य बाजारपेठेतील व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी जागोजागी थांबून अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अस्थिकलशाचे दर्शन घेतले. अनेक ठिकाणी नागरिकांनी अश्रूंनी डोळे भरून श्रद्धांजली अर्पण केली.

खंडोबा चौक परिसरात अस्थिकलश यात्रेला विशेष थांबा देण्यात आला. येथे आदरणीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादांच्या सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक योगदानाचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

या प्रसंगी पुणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, नगराध्यक्षा अबोली ढोरे, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, नगरसेविका माया चव्हाण, नगरसेवक अजय म्हाळसकर, गणेश म्हाळसकर, अजय भवार,  आकांक्षा वाघवले, रुपाली ढोरे, वैशाली सोनवणे, वडगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण ढोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

अस्थिकलश यात्रेदरम्यान शहरात शांतता, शिस्त आणि श्रद्धेचे वातावरण दिसून आले. अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

या यात्रेच्या निमित्ताने वडगाव शहराने आपल्या लाडक्या नेत्याला अश्रूंनी व श्रद्धेने निरोप दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!