Homeशिक्षण-प्रशिक्षणवयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी वैष्णव काकडे ला दुहेरी डॉक्टरेट

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी वैष्णव काकडे ला दुहेरी डॉक्टरेट

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी वैष्णव काकडे ला दुहेरी डॉक्टरेट

जगातील सर्वात तरुण भौतिक शास्त्रज्ञ म्हणून विक्रम प्रस्थापित

तळेगाव दाभाडे : शेतकरी कुटुंबातील वैष्णव शैलेश काकडे या होतकरू तरुणाने वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी दुहेरी डॉक्टरेट मिळवत इतिहास रचला आहे. जगातील सर्वात तरुण भौतिकशास्त्रज्ञ म्हणून विक्रम प्रस्थापित करण्याचा मान वैष्णव यांना मिळाला असून भारताच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.

वैष्णव यांनी भौतिकशास्त्र या विषयात “Quantum Relativity” या अत्यंत अवघड व जटिल विषयावर संशोधन करून डॉक्टरेट संपादन केली. इतकेच नव्हे तर त्यांनी दुसरी डॉक्टरेट पूर्ण करत भारताच्या इतिहासात सर्वात तरुण दुहेरी डॉक्टरेट धारक म्हणून नवे पर्व लिहिले आहे. त्यांच्या या कामगिरीने भारताचे नाव जागतिक पटलावर झळकले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात मोलाचे योगदान

भौतिकशास्त्रासोबतच वैष्णव यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. संशोधनातील त्यांचा दृष्टिकोन व दृष्टी पाहता आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी त्यांना “सर्वात तरुण व्हिजनरी” अशी ओळख दिली आहे.

सन्मान आणि गौरव

त्यांच्या या विलक्षण कामगिरीबद्दल वैष्णव यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यात भारत गौरव रत्न (अर्ध-शासकीय संस्था) आणि BIDDA Business Excellence Award या नामांकित सन्मानांचा समावेश आहे. यामुळे वैष्णव यांचे नाव भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रातील उदयोन्मुख ताऱ्यांमध्ये घेतले जात आहे.

सातत्यपूर्ण प्रयत्नाचे फळ

वैष्णव हे शेतकरी कुटुंबातून येऊन, सातत्यपूर्ण परिश्रम व चिकाटीच्या बळावर उच्चशिक्षणाच्या शिखरावर पोहोचले आहेत. त्यांच्या या प्रवासाने देशभरातील तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. तळेगाव परिसरात आणि मावळ तालुक्यात सर्वत्र वैष्णव यांचे कौतुक व अभिनंदन केले जात असून अनेक मान्यवरांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांचा सत्कार केला आहे.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे – ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!