Homeशिक्षण-प्रशिक्षणवराळेची कन्या ऐश्वर्या कार्ले सीए परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण — मावळचा अभिमान...

वराळेची कन्या ऐश्वर्या कार्ले सीए परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण — मावळचा अभिमान उजळला

वराळेची कन्या ऐश्वर्या कार्ले सीए परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण — मावळचा अभिमान उजळला

तळेगाव दाभाडे (मावळ): “ध्येय ठरवा आणि मनोबलाने वाटचाल करा,” या विचाराची साक्ष देत वराळे (ता. मावळ) येथील ऐश्वर्या नवनाथ कार्ले हिने चार्टर्ड अकाउंटंट्स (CA) परीक्षेत प्रथम श्रेणीत यश मिळवत मावळचा अभिमान वाढवला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (ICAI) घेतलेल्या सप्टेंबर महिन्यातील परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, ऐश्वर्याने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

शेतकरी उद्योजक कुटुंबातील मुलगी असलेल्या ऐश्वर्याने मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल विठ्ठल-रुक्मिणी तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष साहेबराव काशीद-पाटील यांनी कौतुकाचा वर्षाव करत म्हटले, “ऐश्वर्याचे यश म्हणजे ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे.”

मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये हे यश मिळवणारी ऐश्वर्या ही एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. तिने प्राथमिक शिक्षण सेंट माऊंट ऍन स्कूलमध्ये, तर उच्च शिक्षण गरवारे महाविद्यालय, पुणे येथे पूर्ण केले.

अभ्यासात सातत्य, आईचे मार्गदर्शन आणि आत्मविश्वास हेच यशाचे गुपित असल्याचे ऐश्वर्या सांगते.

> “ध्येय निश्चित केल्यावर मनापासून केलेला प्रयत्न कधीही व्यर्थ जात नाही. हे यश माझ्या पालकांच्या आशीर्वादाचे आणि गुरूंच्या प्रेरणेचे फळ आहे,” — असे ती अभिमानाने म्हणाली.

ऐश्वर्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अर्थशास्त्राचे प्रा. सुभाष जगताप, कृषिरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक, तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी तुकाराम महाराज भंडारा ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष साहेबराव काशीद-पाटील यांनी तिला शुभेच्छा दिल्या.

“ऐश्वर्याने दहावी, बारावी आणि बी.कॉम. परीक्षांप्रमाणेच सीए परीक्षेतही प्रथम श्रेणी मिळवून आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीची परंपरा कायम ठेवली आहे,” असे तिचे वडील नवनाथ कार्ले यांनी सांगितले.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!