Homeशिक्षण-प्रशिक्षणविद्यार्थ्यांनी भविष्यात नोकरदार न होता नोकरी देणारे व्हावे – उद्योजक रामदास काकडे

विद्यार्थ्यांनी भविष्यात नोकरदार न होता नोकरी देणारे व्हावे – उद्योजक रामदास काकडे

विद्यार्थ्यांनी भविष्यात नोकरदार न होता नोकरी देणारे व्हावे – उद्योजक रामदास काकडे

तळेगाव येथे शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी

तळेगाव दाभाडे : शहरातील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या सभागृहात रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व मावळ तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुका स्तरीय इयत्ता ५ वी व ८ वी च्या परीक्षार्थींना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेचे उद्घाटन डिस्ट्रिक्ट बेसिक एज्युकेशन व लिट्रसी डायरेक्टर वसंतराव मांळुजकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी विराज खराटे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी नोकऱ्या देणारे व्हावे

यावेळी बोलताना इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक रामदास काकडे यांनी शिक्षकांना उद्देशून मार्गदर्शन केले. ते म्हणाले :

> “आजच्या औद्योगिक व स्पर्धेच्या युगात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्ता धारक शिक्षण द्यायला हवे. विद्यार्थ्यांमधून उद्योजक व क्लास-वन अधिकारी घडले पाहिजेत. केवळ नोकरदार होणे हा पर्याय नसून विद्यार्थी भविष्यात नोकऱ्या देणारे झाले पाहिजेत. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे ही काळाची गरज आहे. देशाची निर्यात वाढली तर प्रगती साधता येईल. त्यासाठी जुन्या व नवीन अध्यापन पद्धतींचा वापर करून उद्याची पिढी सक्षम करणे शिक्षकांचे कर्तव्य आहे.”

काकडे यांनी रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी व मुख्याध्यापक संघाच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

शासन व रोटरीची माहिती

उपशिक्षणाधिकारी विराज खराटे यांनी शासनाच्या विविध गुणवत्ता वाढ योजनांची माहिती शिक्षकांना दिली.

तर वसंतराव मांळुजकर यांनी रोटरी क्लबच्या बदलत्या धोरणांची माहिती देताना सांगितले की,

> “प्रत्येक क्लबने समाजोपयोगी उपक्रम राबवले तर रोटरी फाउंडेशनमार्फत ग्लोबल ग्रँटच्या माध्यमातून मोठे प्रकल्प हाती घेता येतील.”

दिवसभर मार्गदर्शन व शंका निरसन

दिवसभर चाललेल्या कार्यशाळेत शिष्यवृत्ती, नव्या अध्यापन पद्धती, प्रश्नपत्रिकेचा अभ्यास, निकाल सुधारणा व तांत्रिक मार्गदर्शन असे विविध विषय हाताळण्यात आले. शिक्षकांशी थेट संवाद साधून शंका निरसन करण्यात आले.

कल्याणी कडेकर, अश्विनी पाटील, मंगल आहेर, बोरसे मॅडम, उमेश इंगूळकर यांनी मास्टर ट्रेनर म्हणून काम पाहिले.

मान्यवरांचा सहभाग व सत्कार

उपक्रमाच्या समन्वयक दिपाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुकुंद तनपुरे यांनी केले, सूत्रसंचालन राजेश बारणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दशरथ ढमढेरे यांनी मानले.

अध्यक्ष भगवान शिंदे, सह प्रकल्प प्रमुख ॲड. रामदास काजळे व रोटरी सदस्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे (गुरुजी), मुख्याध्यापक संघाचे राजेश गायकवाड, उपाध्यक्ष सुरेश दाभाडे यांनी मनोगत व्यक्त केले.

याशिवाय रोटरी सिटीचे संस्थापक विलास काळोखे, प्राचार्य डाॅ. संभाजी मलघे, सहप्रांतपाल भालचंद्र लेले, सेक्रेटरी संजय मेहता, दिलीप पारेख, सुरेश शेंडे, संदीप मगर, संदीप पानसरे, विठ्ठल माळशिकारे, विकास तारे यांसह अनेक मान्यवर व रोटरी तसेच मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपक्रमाची यशस्वीता

संग्राम जगताप, निलेश राक्षे, आनंदराव रिकामे, स्वाती मुठे, मनिषा पारखे, वैशाली लगाडे, वर्षा खारगे, कमल ढमढेरे, दिनेश निळकंठ, संजय भागवत, मोहन खांबेटे, रघुनाथ कश्यप, विश्वास कदम यांच्यासह रोटरी व मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

(प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे ९९२१८०७०११)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!