Homeराजकीयसंजय गांधी योजना व श्रावण बाळ योजनेंतर्गत मावळातील १२८ लाभार्थींना मंजुरी पत्रकांचे...

संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजनेंतर्गत मावळातील १२८ लाभार्थींना मंजुरी पत्रकांचे वाटप

वडगाव मावळ (प्रतिनिधी) २४ एप्रिल  आमदार सुनील अण्णा जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा उपक्रम राबवण्यात आला. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना या दोन महत्वाच्या सामाजिक योजनेंतर्गत एकूण १२८ लाभार्थींना मंजुरी पत्रकांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार असून, त्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमात नबीलाल अत्तार, गणेश तळपे, रूपेश सोनूने, ऋषिकेश गायकवाड आणि केदार बावरे आदी मान्यवर उपस्थित होते.

योजना कशा आहेत?

संजय गांधी निराधार अनुदान योजना  ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत, निराधार, अपंग, विधवा व घटस्फोटित महिलांसाठी राबवली जाते. या योजनेत दरमहा आर्थिक सहाय्य देऊन त्यांचा आधार वाढवला जातो.

श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना  ही ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी असून त्यांना दरमहा ठराविक रक्कम निवृत्ती वेतन स्वरूपात दिली जाते, जेणेकरून त्यांचे वृद्धत्व सन्मानाने व्यतीत होऊ शकेल.

कार्यक्रमात लाभार्थ्यांनी प्रशासन व आमदार कार्यालयाचे आभार मानले. अनेक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!