Homeराजकीयमावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस च्या...

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस च्या वाढत्या महागाई विरोधात आंदोलन

वडगांव मावळ (प्रतिनिधी) २४ एप्रिल वाढती महागाई मुळे सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे त्यामुळे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस च्या वाढत्या महागाई विरोधात केंद्र सरकारच्या महागाईच्या धोरणाच्या विरोधात एल्गार आंदोलन करण्यात आले

सध्या कच्च्या तेलाच्या किमती चार वर्षाच्या निचांकी पातळीवर (प्रति बॅरल ६५.४१ आल्या आहेत. यापूर्वी एप्रिल २०२१ मध्ये किंमत प्रति बॅरल ६३.४० होती. या घसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेल शुद्धीकरणातून मिळणारे उत्पन्न ऐतिहासिक पातळीवर पोहोचले आहे. रेटिंग एजन्सी नुसार सध्या तेल कंपन्यां पेट्रोलवर प्रतिलिटर १२-१५ रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर ६-१२ रुपये नफा कमवत आहेत.

तेल कंपन्यांनी गेल्या एक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केलेल्या नाहीत सरकार पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवून जनतेच्या पैशाची लूट करत आहे याच्या निषेधार्थ मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महागाईच्या विरोधात एल्गार आंदोलन करण्यात आले अशा आशयाचे निवेदन मावळचे नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना देण्यात आले.

यावेळी मावळ तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मावळ प्रभारी तथा पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग अतुल राऊत, युवक तालुकाध्यक्ष विशाल वहिले, महिला तालुकाध्यक्ष जयश्रीताई पवार, अल्पसंख्यांक विभाग जिल्हा उपाध्यक्ष आफताब सय्यद, संपर्कप्रमुख विजय शिंदे, उपाध्यक्ष माणिक गाडे, ज्येष्ठ नेते बारकूभाऊ ढोरे, कामशेत शहर अध्यक्ष संतोष वीर, युवक अध्यक्ष सूरज पुरी, तळेगाव युवक अध्यक्ष प्रतिक जांभळे, संदिप लोहोर, अनिल खांदवे, योगेश करवंदे, महेश सावंत, महादू लोंढे, राहील तांबोळी, मंगेश गावडे, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!