
सकल मराठा परिवार मावळ तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
तळेगाव दाभाडे (स्टेशन): “रक्तदान हे श्रेष्ठ दान” या संदेशाला अधोरेखित करत सकल मराठा परिवार मावळतर्फे तळेगाव स्टेशन परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आपत्कालीन प्रसंगी तसेच विविध वैद्यकीय उपचार प्रक्रियेत रक्ताचा सातत्याने भासणारा तुटवडा लक्षात घेता या शिबिराचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.


हे शिबिर रविवार, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक ६ (गुलाबी शाळा), तळेगाव स्टेशन येथे संपन्न होणार आहे.
“एका रक्तदात्याच्या छोट्या कृतीमुळे तीन जीवांना नवीन संजीवनी मिळू शकते,” असा महत्त्वपूर्ण संदेश आयोजकांनी दिला.
त्यांनी पुढे सांगितले.
“रक्तदान करा, जीव वाचवा
“तुमच्या रक्तामुळे एखाद्या गरजूंना नवीन जीवन मिळू शकते.


“रक्तदान हे जीवनदान—आपल्या कृतीने एखाद्याच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो.”
समाजातील प्रत्येक सक्षम आणि निरोगी नागरिकाने रक्तदानाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे आवाहनही आयोजकांकडून करण्यात येत आहे.
रक्तदानाचा अनुभव अनेक दात्यांना प्रेरणा देणारा ठरतो. वाढदिवस अथवा विशेष दिनी रक्तदान करण्याची सवय समाजात सकारात्मक बदल घडवते, असेही आयोजकांनी सांगितले. “दर तीन महिन्यांनी रक्तदान केल्याने आरोग्य सुधारते आणि समाजकार्याची जाणीव वाढते,
या रक्तदान शिबिरासाठी स्वयंसेवक, युवक-युवती तसेच विविध सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे. स्थळाची तयारी, वैद्यकीय पथकांची व्यवस्था, नोंदणी प्रक्रिया इत्यादी सर्व कामे अंतिम टप्प्यात असून नागरिकांच्या सहभागासाठी आवाहन जोरात सुरू आहे.


अधिक माहितीसाठी संपर्क:
विजय कदम = 9730988503
दिपाली तांबे = 9960067275
सतीश शेलार = 9921050200
राहुल भानुसघरे = 9922344838
कृष्णा साबळे = 9762803979
मोरेश्वर मांडेकर = 8390849086
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















