सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलचा १०० टक्के निकाल
तळेगाव दाभाडे : येथील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलचा एसएससी बोर्ड २०२५ चा निकाल १०० टक्के लागला असून प्रथम क्रमांक सानिया संजय आवटे=96.20 टक्के, द्वितीय क्रमांक स्वरूप संजय ओव्हाळ=92 टक्के, तृतीय क्रमांक साहिल सोमनाथ गुजर=90 टक्के गुण मिळाले आहे. तसेच ३० विद्यार्थी 75 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून व 5 विद्यार्थिनी 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले आहे.
माजी राज्यमंत्री संजय( बाळा) भेगडे. संस्थेचे अध्यक्ष सुनील बबनराव भेगडे, दत्तात्रय पंढरीनाथ नाटक भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश किसनराव भेगडे व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे




















