Homeशिक्षण-प्रशिक्षण१०२ विद्यार्थ्यांसाठी फक्त एकच शिक्षक आदिवासी बहुल बेलज शाळेकडे शिक्षण विभागाचे जाणीवपूर्वक...

१०२ विद्यार्थ्यांसाठी फक्त एकच शिक्षक आदिवासी बहुल बेलज शाळेकडे शिक्षण विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

टाकवे बुद्रुक :मावळ तालुक्यातील बेलज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. तब्बल १०२ आदिवासी विद्यार्थ्यांना फक्त एकाच शिक्षकाच्या आधारावर शिक्षण दिले जात आहे, ही वस्तुस्थिती समोर आल्यानंतर पालक, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असताना बेलजसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना त्यापासून वंचित राहावे लागत आहे, ही शिक्षण विभागाची मोठी बेफिकिरी मानली जात आहे.

गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की, “आदिवासी विद्यार्थी शिकत असल्यामुळेच या शाळेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का?” असा गंभीर प्रश्न आता उभा राहिला आहे. पहिली ते सातवीपर्यंतचे सर्व वर्ग, सर्व विषय, सर्व शालेय उपक्रम—हे सर्व एकट्या शिक्षकाच्या खांद्यावर असल्याने गुणवत्तापूर्ण अध्यापन अशक्य बनले आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर गंभीर परिणाम होत असून त्यांचे भविष्य धोक्यात येत आहे.

ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकारी आणि शिक्षण विभागाकडे वारंवार निवेदने, तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. अतिरिक्त शिक्षक पाठवण्याचे आश्वासन मिळते, मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल होत नाही. शाळेतील वाढते विद्यार्थीसंख्येचे प्रमाण आणि उपलब्ध मनुष्यबळातील तफावत शिक्षण विभागाच्या धोरणात्मक अपयशाची साक्ष देत आहे.

बेलज येथील पालकांचा आग्रह आहे की शासनाने तातडीने अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करावी, शाळेच्या सुविधांचा आढावा घ्यावा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी ठोस पावले उचलावीत.

बेलज शाळेतील हा अन्यायकारक शिक्षण-अभावाचा प्रश्न शासनाने तत्परतेने सोडवणे हीच आता काळाची गरज बनली आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!