Homeमहत्त्वाचे१७१९ प्रकरणे निकाली; वडगाव मावळ लोकअदालतीत १३ कोटींची विक्रमी वसुली

१७१९ प्रकरणे निकाली; वडगाव मावळ लोकअदालतीत १३ कोटींची विक्रमी वसुली

१७१९ प्रकरणे निकाली; वडगाव मावळ लोकअदालतीत १३ कोटींची विक्रमी वसुली

वडगाव मावळ (ता. मावळ) : अति. जिल्हा व सत्र न्यायालय वडगाव मावळ येथे शनिवार, दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १०.३० वाजता दीप प्रज्वलन करून या लोकन्यायालयाचे उद्घाटन झाले. या लोकन्यायालयात तब्बल १७१९ प्रकरणे निकाली काढण्यात आली तर १३ कोटी ९ लाख ५७९ रुपयांची विक्रमी वसुली विविध संस्थांकडून करण्यात आली.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार हे लोकन्यायालय पार पडले. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. डि. के. अनभुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

कोणती प्रकरणे निकाली काढली?

या लोकन्यायालयात विविध प्रकारची प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यामध्ये –

मोटारवाहन कायद्यांतर्गत नुकसानभरपाईची प्रकरणे,

कौटुंबिक वाद,

बँकांचे थकीत कर्ज वसुली,

धनादेश न वटल्याची प्रकरणे (कलम १३८),

नगरपरिषद व ग्रामपंचायतींची घरपट्टी व पाणीपट्टी वसुली,

वीजबिल थकबाकी (एम. एस. ई. बी.),

तसेच दिवाणी व फौजदारी प्रकरणांचा समावेश होता.

दिवसभर चाललेल्या या लोकन्यायालयात पक्षकारांमध्ये परस्पर तडजोड घडवून आणण्यात आली. परिणामी एकाच दिवशी १७१९ प्रकरणे निकालात निघाली आणि तब्बल १३,०९,००,५७९ रुपयांची वसुली झाली.

न्यायमूर्ती व पॅनलची भूमिका

या लोकन्यायालयात पॅनल प्रमुख म्हणून मा. श्री. डि. के. अनभुले (जिल्हा न्यायाधीश-१, वडगाव मावळ) यांनी काम पाहिले. त्यांना मा. आर. व्ही. हुद्दार (जिल्हा न्यायाधीश-२), मा. श्री. एस. जी. दुबाले, मा. श्री. एस. एस. देशमुख, मा. श्री. ए. एम. विभुते, मा. श्रीमती एस. ए. माळी व मा. श्रीमती के. ए. देशपांडे (सह दिवाणी न्यायाधीश) वडगाव मावळ बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अॅड.प्रतापराव शेलार यांचे सहकार्य लाभले.

पॅनल जज म्हणून अॅड. वाय. पी. गोरे, अॅड. हेमंत वाडेकर, अॅड. एस. के. भेगडे, अॅड. अमोल देसाई, अॅड. रुबीया तांबोळी, अॅड. अमोल दाभाडे व अॅड. अमर पाटील, ॲड शैलेश घारे, ॲड चंद्रकांत खांदवे यांनी काम पाहिले.

न्यायिक कर्मचाऱ्यांचे सहकार्य

या लोकन्यायालयात सर्व पक्षकारांसह न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग होता. श्री. मिलिंद गुंडा (अधिक्षक, अति. जिल्हा व सत्र न्यायालय, वडगाव मावळ), श्री. विनायक जाधव (अधिक्षक, दिवाणी न्यायालय), श्रीमती पी. एस. घाडगे (सहा. अधीक्षक) आणि श्रीमती व्ही. व्ही. आबनावे (सहा. अधीक्षक) यांचे विशेष सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!