तळेगावातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरामध्ये देवशयनी आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
तळेगाव दाभाडे: शहरातील शाळा चौक येथील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठल मंदिर संस्थांच्या वतीने पांडुरंगाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक ६जुलै २०२५ रोजी पहाटे मंदिरातील सेवेकरी सीमा शेळके. चारुशीला हुलावळे, पांडुरंग गदादे यांच्या हस्ते पारंपारिक पूजा करण्यात आली.
त्यानंतर तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व सौ वैष्णवी सरनाईक यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. श्री विठ्ठल मंदिर संस्थांचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, सारिका संजय भेगडे, संतोष( विकास) भेगडे, हिंदूराज भेगडे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. काकड आरती. हरिपाठ भजन तसेच हरिभक्त परायण श्रीपाद अभ्यंकर यांच्या कीर्तनाने मंदिर परिसर भक्तिमय झाला.
रात्री जागराचे आयोजन करण्यात आले होते. देवशयनी आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण विठ्ठल मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने सजवण्यात आले होते. भाविक भक्तांसाठी विशेष दर्शन बारीचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर भाविक भक्तांनी पांडुरंगाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पावसातही भाविक भक्तांनी रांगा लावून मोठ्या उत्साहाने पांडुरंगाचे दर्शन घेतले. तसेच गेल्या ५४ वर्षाचे परंपरा असलेले रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन ची विद्यार्थ्यांची दिंडी यावर्षी देखील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात दाखल झाली होती
सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग सादर केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दीपक फोंडके, विश्वस्त नंदन रेगे, शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. लायन्स क्लब तळेगाव दाभाडे यांच्यावतीने ३५ वर्षापासून सलग दिंडीमध्ये सहभागी भाविकांसाठी प्रसाद वाटपाची परंपरा यावर्षी देखील कायम ठेवण्यात आली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांसाठी मैत्री यश संस्था आणि श्री विठ्ठल मंदिर संस्थांच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल मंदिर ट्रस्टचे हरिभक्त परायण बाळकृष्ण आरडे महाराज, यतीन सुरेशभाई शहा, श्याम बाळासाहेब भेगडे, प्रशांत शामराव दाभाडे, नारायण धामणकर, ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे( गुरुजी), अरविंद हांडे पाटील, विलास गायकवाड, प्रकाश वालझाडे यांनी परिश्रम घेतले तर संपूर्ण धार्मिक नियोजन मंदिराचे पुजारी अतुल देशपांडे व सीमा शेळके यांनी केले.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११



















