Homeसामाजिकसदापूरात अटलजी जयंती व रामदास आठवले वाढदिवसानिमित्त योजनांचा ‘लोककल्याण सोहळा

सदापूरात अटलजी जयंती व रामदास आठवले वाढदिवसानिमित्त योजनांचा ‘लोककल्याण सोहळा

सदापूरात अटलजी जयंती व रामदास आठवले वाढदिवसानिमित्त योजनांचा ‘लोककल्याण सोहळा

सदापूर (मावळ): देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त तसेच देशाचे सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त सदापूर मावळ येथे समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने विविध शासकीय योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या हाती सुपूर्द करण्यात येत ‘लोककल्याण सोहळा’ उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे, मावळ भूषण कीर्तनकार ह.भ.प. सौ. मोनिका मांडेकर आणि सामाजिक कार्यकर्त्या अश्विनीताई अमोल भेगडे उपस्थित होत्या. विशेष म्हणजे, या उपक्रमात महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमात विविध शासकीय योजना, लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या ठरत असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. यावेळी बोलताना अश्विनी अमोल भेगडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. महिलांनी तसेच गरजू नागरिकांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे जीवनमान उंचावावे,” असे आवाहन त्यांनी केले.

तसेच अमोल भेगडे यांनी आपल्या मनोगतात अटल बिहारी वाजपेयी यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाचा आणि रामदास आठवले यांच्या सामाजिक न्यायासाठीच्या कार्याचा गौरव केला. “अटलजींचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि रामदास आठवले यांचे वंचित घटकांसाठीचे कार्य हे समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमादरम्यान लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आत्मविश्वास दिसून येत होता. शासकीय योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहादू बडेकर आणि शांताराम डाकोळ यांनी संयत व प्रभावी शैलीत केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अश्विनी अमोल भेगडे यांनी उपस्थितांचे आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.

सदापूरातील हा उपक्रम शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरला.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!