तळेगावातील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिरात श्री संत नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या समाधी सोहळ्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
तळेगाव दाभाडे : शहरातील शाळा चौक येथे असणाऱ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिरात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७५व्या समाधी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
श्री विठ्ठल मंदिरात नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष मुरलीधर महाराज ढेकणे यांच्या हस्ते सकाळी संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विठ्ठल मंदिराचे विश्वस्त हरिभक्त परायण बाळकृष्ण आरडे महाराज, उत्सव समितीचे सचिव विलासराव नवाळे, नारायणराव धामणकर, ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे (गुरुजी), विलास गायकवाड, प्रशांत शामराव दाभाडे, श्याम बाळासाहेब भेगडे, यतीन सुरेशभाई शहा, आदी उपस्थित होते, पहाटे संतोष गाडेकर कुटुंबीयांच्या वतीने मंदिरात पांडुरंगाची काकड आरती व महापूजा संपन्न झाली.
त्यानंतर महाआरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी हरिभक्त परायण देवराम महाराज खराडे. मंदिराचे पुजारी अतुल देशपांडे यांसह अनेक सेवेकरी उपस्थित होते. संत नामदेव महाराज पुण्यतिथीनिमित्त हरिभक्त परायण मुरलीधर महाराज ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली नामदेव गाथा पारायण सोहळा सुरू करण्यात आला. यावेळी दिलीप हेंद्रे. हरिदास वनारसे तसेच अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०१२



















