शाळेच्या क्रीडांगणावर भरतो मद्यपींचा अड्डा. शिकाऊ वाहन चालक करतात क्रीडांगणाचा वापर
तळेगाव दाभाडे: येथील मारुती मंदिर चौकात असणाऱ्या थोर समाजसेवक नथूभाऊ बाबुराव भेगडे (पाटील) शाळेच्या क्रीडांगणावर रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा भरत असतो. शाळेच्या क्रीडांगणावर व आवारात दारूच्या बाटल्या. ग्लास. सिगारेटची पाकिटे. गुटख्याच्या पुड्या सापडत आहे.
शाळा हे विद्येचे माहेरघर मानले जाते मात्र दारुड्यांनी अशा पवित्र ठिकाणाला आपला अड्डाच बनविला आहे. शाळेच्या आवारात मद्यपीचा अड्डा बनने हे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी व शिक्षणासाठी धोकादायक आहे. शाळेच्या आवारात योग्य सुरक्षा नसल्याने मद्यपी येथे सहजपणे प्रवेश करतात. त्यामुळे शाळेच्या आवारात सुरक्षारक्षक किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर अनेक तरुण व मुले शाळेच्या क्रीडांगणावर खेळत असताना काही नागरिक चार चाकी वाहन शिकण्यासाठी या क्रीडांगणाचा वापर करत असतात मुले खेळत असताना देखील काही नागरिक बिनधास्तपणे मुलांच्या आजूबाजूला चार चाकी वाहन चालवण्याचे शिक्षण घेत आहे. भविष्यात अशा शिकाऊ वाहन चालकामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे.
तरी नगरपरिषद प्रशासनाने व पोलिसांनी अशा मद्यपींचा व शिकाऊ वाहन चालकांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी या क्रीडांगणावर खेळत असणाऱ्या अनेक मुलांनी केली आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















