वडगांव शहरात गणेशोत्सवापुरता मर्यादित नसून सार्वजनिक मिरवणुकांना डी जे बंदी वरीष्ठ पोलिस निरीक्षक कुमार कदम
वडगांव मावळ : गणेशोत्सव काळातील डीजेचा वापर आरोग्यास हानीकारक ठरत असेल तर गणेश उत्सवात निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीतही तो हानिकारकच असेल, असे सांगून आरोग्यास हानिकारक असलेल्या डीजे बंदीचा आदेश गणेशोत्सवापुरता मर्यादित नसून तो सगळ्याच प्रकारच्या सार्वजनिक मिरवणुकांना लागू आहे. असे वडगांव मावळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले आहे.
तसेच गणेश उत्सव मंडळाने इतर खर्च टाळून गावात काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी केले आहे.
पोटोबा देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे यांनी सांगितले डी जे : बंदी घालण्यात येणाऱ्या निर्णयावर पोटोबा देवस्थान, जय बजरंग तालीम मंडळ व आमच्या सोबत असणारे मंडळ या निर्णयाचे पालन करतील
भास्करराव म्हाळसकर यांनी डी जे बंदी झालेल्या निर्णयानुसार सर्व गणेश मंडळांनी याचे पालन करणे आवश्यक आहे असे आवाहन केले आहे
मंगेशकाका ढोरे यांनी सांगितले वडगांव शहरात जर डीजे बंदी घालण्यात नाही आली तर मी स्वता उपोषणाला बसले असा इशारा दिला आहे.
यावेळी वडगांव मावळ पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात मिटींगला पोटोबा देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे, विश्वस्त भास्करराव म्हाळसकर, सुभाषराव जाधव, तुकाराम ढोरे, अनंता कुडे, सुनिता कुडे, गुलाबराव म्हाळसकर, मंगेशकाका ढोरे, संभाजी म्हाळसकर, विशाल वहीले, अतुल राऊत, उमेश ढोरे, कल्पेश भोंडवे, सोमनाथ धोंगडे, पत्रकार सुदेश गिरमे, बाळासाहेब वाघमारे, महादेव वाघमारे, सतिश गाडे, संजय दंडेल, तसेच गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















