Homeक्राईमवडगावातील अवैध धंदे बंद करण्याची शहर भाजपाची मागणी

वडगावातील अवैध धंदे बंद करण्याची शहर भाजपाची मागणी

वडगाव मावळ दि.३०: वडगाव शहरातील तरुणाईमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे असून हे सर्व अवैध धंदे पोलिसांनी तातडीने बंद करावेत अशा आशयाची मागणी करणारे निवेदन वडगाव शहर भाजपाने आज पोलिस निरीक्षक कुमार कदम यांना दिले.

वडगाव शहर ही तालुक्याची प्रशासकिय राजधानी आहे तसेच येथे शाळा व वरीष्ठ महाविद्यालय असल्याने येथे युवा वर्ग व तालुक्यातील नागरीकांची कायमच वर्दळ असते.शहराची ओळख सांस्कृतिक केंद्र व क्रीडापंढरी म्हणून देखील आहे आणि ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेले देवस्थान गावात आहे. गावची ओळख व नावलौकिक वेगळ्या स्वरूपाचा आहे. परंतु मागील काही दिवसांत वडगावची ही ओळख पुसट होऊन अवैध धंदे व व्यसनाधीनतेचे शहर म्हणून होऊ पाहत आहे.

भविष्यातील वाढत्या गुन्हेगारीचा हा पाया आहे. म्हणून पोलिसांनी तातडीने कारवाई करून शहरातील अवैध धंद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करावेत, याकामी आम्ही तुमच्या सोबत आहोत असे या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी भाजप शहराध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर, श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, यांच्यासह माजी नगरसेवक रविंद्र म्हाळसकर, अमोल पगडे, भाजयुमो चे अध्यक्ष आतिश ढोरे, मकरंद बवरे, शरद मोरे, कल्पेश भोंडवे, विकी म्हाळसकर, नितीन ओव्हाळ, भोलेनाथ म्हाळसकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!