Homeसामाजिकतळेगावात घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन

तळेगावात घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन

तळेगावात घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन

तळेगाव दाभाडे : महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांची सर्जनशीलता वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन तर्फे उद्योजक गणेश मोहनराव काकडे व तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होत असून तळेगाव शहर हद्दीतील माता-भगिनींसाठी खास आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे नियम व अटी

  • ही स्पर्धा केवळ तळेगाव शहर हद्दीतील महिलांसाठी आहे.
  • स्पर्धेचा कालावधी रविवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ ते बुधवार दिनांक ३ सप्टेंबर २०२५ असा असेल.
  • सजावटीत पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करणे अनिवार्य आहे.
  • महिलांनी स्वतः बनवलेली आणि सर्जनशीलतेला अधोरेखित करणारी सजावट ग्राह्य धरली जाईल.
  • स्पर्धकांनी आपली सजावट व्हिडिओ स्वरूपात (मोबाईल आडवा धरून) तसेच सजावटीचा एक फोटो खालील व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा : ९७६२१३३३२४.
  • व्हिडिओ सोबत स्पर्धकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व सजावटीची संकल्पना नमूद करणे आवश्यक आहे.
  • परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

अधिक माहितीसाठी संपर्क : ७०३८७८४८७५

आकर्षक बक्षिसांची मेजवानी

या स्पर्धेत विजेत्यांसाठी भरघोस बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे :

  • विशेष प्राविण्य : मानाचा महापैठणी
  • प्रथम क्रमांक : मानाची पैठणी
  • द्वितीय क्रमांक : सोन्याची नथ
  • तृतीय क्रमांक : चांदीचा छल्ला
  • उत्तेजनार्थ तीन बक्षिसे
  • सहभागी सर्व स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात येणार असून बक्षीस वितरण सोहळ्यात उपस्थित महिलांसाठी भव्य लकी ड्रॉ देखील ठेवण्यात आला आहे.

बक्षीस वितरण सोहळा

या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवार दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता तळेगाव स्टेशनजवळील वनश्री नगर येथील श्रीरंग कलानिकेतन येथे पार पडणार आहे.

आयोजकांचे आवाहन

या स्पर्धेचे संयोजन उद्योजक गणेश मोहनराव काकडे, तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. रेशमा फडतरे तसेच फाउंडेशनमधील सहकारी व सदस्य यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. तळेगावातील सर्व माता-भगिनींनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली कला सादर करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे – ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!