Homeसामाजिकमावळ मधील कार्यशील व कर्तृत्ववान दिव्यांग महिलांचा सन्मान सोहळा

मावळ मधील कार्यशील व कर्तृत्ववान दिव्यांग महिलांचा सन्मान सोहळा

मावळ मधील कार्यशील व कर्तृत्ववान दिव्यांग महिलांचा सन्मान सोहळा

तळेगाव दाभाडे : राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल मावळ तालुक्याच्या वतीने “सन्मान नवदुर्गांचा” या उपक्रमांतर्गत तालुक्यातील कार्यशील व कर्तृत्ववान दिव्यांग महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

हा उपक्रम राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रूपालिताई चाकणकर यांच्या संकल्पनेनुसार, मावळ आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व मावळ तालुकाध्यक्षा सुवर्णाताई राऊत यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. याचे नेतृत्व दिव्यांग सेल मावळ तालुका महिला अध्यक्षा ज्योतीताई भरत राजिवडे यांनी केले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी ग्रामीण ब्लॉक अध्यक्षा पुष्पाताई घोजगे, अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष शबनम खान, समाज कल्याण तालुकाध्यक्षा मनीषा रघुवंशी, तळेगाव शहर युती अध्यक्षा सौ. प्रिया मोडक आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन : उपाध्यक्ष छायाताई साळुंखे यांनी केले.

ज्योतीताई राजिवडे यांनी सांगितले की, दिव्यांग महिला देखील आपल्या कुटुंबासोबत नोकरी व व्यवसाय सांभाळत समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करतात. अशा कार्यशील महिलांचा सन्मान करण्याची संधी मिळणे हे सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्याजोगे आहे, असे त्या भावुक होत म्हणाल्या.

अल्पसंख्यांक सेल अध्यक्षा शबनम शेख यांनी उपक्रमाचे कौतुक करत ज्योतीताईंचे आभार मानले. समाजकल्याण तालुकाध्यक्षा मनीषा रघुवंशी यांनी दिव्यांग महिलांचे कौतुक करत त्यांच्या कार्यातून सर्वसामान्य महिलांनाही ऊर्जा मिळते, असे गौरवोद्गार काढले. माजी ग्रामीण ब्लॉक अध्यक्षा पुष्पाताई घोजगे यांनी दिव्यांग महिलांच्या समस्यांवर प्रकाश टाकत त्यांच्याशी जवळून संवाद साधण्याची संधी मिळाल्याचे सांगितले.

कार्यक्रमात वैशालीताई काळे, शालीनी ठुबे, कुमारी योगिता कांबळे, हेमलता जाधव, महादेवी बोहिणी, अश्विनी जाधव, अनिता बडे, महानंदा सूर्यवंशी, सुनिता जैन, अश्विनी बेंद्रे यांचा तुळशीचे रोपटे, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

या सोहळ्यात दिव्यांग सेल तालुका कार्याध्यक्षा  राजश्री नाईकरे, उपाध्यक्ष छाया साळुंखे, उपाध्यक्ष सुरैया शेख, शहराध्यक्षा  मोहिनी काळे, रेखा बरीदे, माधुरी गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

आभार प्रदर्शन दिव्यांग सेल कार्याध्यक्ष राजश्री नाईकरे यांनी मानले. सोहळ्याला नरवीर तानाजी मित्र मंडळाचे सदस्य, तानाजी नगरातील वडीलधारी मंडळी, माता-भगिनी व लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!