Homeमहत्त्वाचेतळेगावकरांच्या रस्त्यावरील खड्डे विरोधातील आंदोलनाला प्रशांत दादा भागवत यांचा जाहीर पाठिंबा

तळेगावकरांच्या रस्त्यावरील खड्डे विरोधातील आंदोलनाला प्रशांत दादा भागवत यांचा जाहीर पाठिंबा

तळेगावकरांच्या रस्त्यावरील खड्डे विरोधातील आंदोलनाला प्रशांत दादा भागवत यांचा जाहीर पाठिंबा

तळेगाव दाभाडे : तळेगाव ते चाकण महामार्गावरील प्रचंड खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून अखेर आज तळेगावकर नागरिकांनी पीडब्ल्यूडी विभागाच्या गलथान कारभाराविरोधात मराठा क्रांती चौकात आमरण उपोषणास सुरुवात केली. अनेक वर्षांपासून या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडले आहेत आणि निरपराध नागरिकांचे प्राण गेले आहेत. वारंवार तक्रारी करूनही पीडब्ल्यूडी विभागाकडून दुरुस्तीचे कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. या निष्क्रियतेविरोधात अखेर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

या आंदोलनाला तळेगाव परिसरातील जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असून या रस्त्यावरील खड्ड्यांचा इंदोरी येथील नागरिकांना देखील मोठा त्रास होत असल्याने या आंदोलनाला प्रशांत दादा भागवत यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला. “नागरिकांचा आवाज हा शासनाने ऐकला पाहिजे. विकासकामांच्या नावाखाली जीव धोक्यात येत असतील, तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,” असे मत प्रशांत दादा भागवत यांनी यावेळी व्यक्त केले.

तळेगाव ते चाकण महामार्ग हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि रुग्णवाहिका प्रवास करतात. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. वाहनधारकांची कंबरडे मोडली आहेत, रुग्णवाहिकांना अडथळे निर्माण होत आहेत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अखेर जनतेने आपला रोष व्यक्त करत आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. प्रशांत दादा भागवत यांच्या पाठिंब्यामुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळाले असून, शासन आणि प्रशासनावर दबाव वाढला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!