Homeसामाजिकपल्स पोलिओ मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद : १२ हजारांहून अधिक बालकांना पोलिओ डोस

पल्स पोलिओ मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद : १२ हजारांहून अधिक बालकांना पोलिओ डोस

पल्स पोलिओ मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद : १२ हजारांहून अधिक बालकांना पोलिओ डोस

तळेगाव दाभाडे – प्राथमिक आरोग्य केंद्र.रोटरी क्लब गोल्डन तळेगाव दाभाडे आणि रोटरी आशा सेविका ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. १२ ऑक्टोबर) पल्स पोलिओ मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेला तळेगाव शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या दिवशी तळेगाव शहरात ५ वर्षांखालील ७१७२ आणि ५ वर्षांवरील ६४, अशा एकूण ७२३६ बालकांना, तर तळेगाव ग्रामीण भागात ५ वर्षांखालील ४८९९ आणि ५ वर्षांवरील २९, अशा एकूण ४९२८ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात आला.

त्यामुळे एकूण १२,१६४ बालकांचे लसीकरण करण्यात आले.

ज्या बालकांना रविवारी केंद्रावर पोलिओचा डोस घेता आला नाही, त्यांच्यासाठी विशेष घरपोच लसीकरण मोहीम राबवण्यात आली. सोमवार (दि. १३ ऑक्टोबर) रोजी ११० आणि मंगळवार (दि. १४ ऑक्टोबर) रोजी १३५ बालकांना आशा सेविकांनी घरी जाऊन पोलिओचे थेंब पाजले.

मोहिमेच्या यशस्वीतेसाठी रोटरी आशा सेविका ग्रुप (RCC) तर्फे शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच रोटरी क्लब गोल्डन तळेगावच्या वतीने शहर व ग्रामीण भागात बॅनर्स लावून व्यापक प्रसार करण्यात आला.

या उपक्रमाबाबत रोटरी क्लब गोल्डन तळेगावचे अध्यक्ष रो. संतोष शांताराम परदेशी म्हणाले,

> “संपूर्ण जगातून पोलिओ निर्मूलन करण्याचा संकल्प रोटरी क्लबने केला आहे. त्या माध्यमातून रोटरी समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी मोठे कार्य करत आहे.”

कार्यक्रमात उपाध्यक्ष रो. प्रशांत ताये, सचिव रो. प्रदीप टेकवडे, क्लब ट्रेनर रो. दीपक फल्ले, तसेच रो. प्रदीप मुंगसे, रो. राकेश गरुड, रो. बसप्पा भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.

या मोहिमेचे नियोजन प्रोजेक्ट चेअरमन रो. किरण ओसवाल आणि रो. सौरभ मेहता (मेडिकल डायरेक्टर) यांनी केले. मार्गदर्शन प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधीक्षक डॉ. मनोज चौधरी व डॉ. भारती पोळ यांनी केले.

रोटरी आशा सेविका ग्रुपच्या अध्यक्षा सौ. अनिता भेगडे, उपाध्यक्षा सौ. मंदाकिनी साळवे, सचिव सौ. वैशाली मेठल, एडमिन डायरेक्टर सौ. शालिनी रणभरे आणि सर्व आशा सेविकांनी लसीकरण मोहिमेला यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर, नर्स व आरोग्य कर्मचारी यांनी देखील समर्पितपणे कार्य करून या उपक्रमाला यश मिळवून दिले.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०१११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!