Homeमहत्त्वाचेस्थानिकांच्या भावनांचा उद्रेक : वडगांव नगरपंचायतीचा अन्यायकारक विकास आराखडा रद्द करावा —...

स्थानिकांच्या भावनांचा उद्रेक : वडगांव नगरपंचायतीचा अन्यायकारक विकास आराखडा रद्द करावा — भाजपा कडून महसूल मंत्र्यांना निवेदन

स्थानिकांच्या भावनांचा उद्रेक : वडगांव नगरपंचायतीचा अन्यायकारक विकास आराखडा रद्द करावा — भाजपा कडून महसूल मंत्र्यांना निवेदन

वडगांव, ता. मावळ : वडगांव नगरपंचायतीने तयार केलेला बिल्डर धार्जिणा आणि स्थानिक शेतकरी, गावकरी तसेच धार्मिक स्थळांवर अन्याय करणारा विकास आराखडा तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी वडगांव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वडगांव परिसरातील स्थानिक जमिनीधारक, शेतकरी, तसेच ग्रामस्थांच्या जमिनींचे नियोजन न करता नगरपंचायतीने तयार केलेला विकास आराखडा पूर्णपणे अन्यायकारक आहे. या आराखड्यात धार्मिक प्रार्थनास्थळांवरही विकास आराखड्याच्या रेषा टाकण्यात आल्या असून त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावनांना धक्का बसला आहे.

भाजपच्या प्रतिनिधीमंडळामध्ये माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, वडगांव नगरपंचायत निवडणुकीचे भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर, ज्येष्ठ नेते अविनाश बवरे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, शहराध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर, भाजपा नेते अरुण चव्हाण तसेच नगराध्यक्ष पदाच्या भाजपा युतीच्या इच्छुक ॲड. मृणाल म्हाळसकर प्रमुख उपस्थित होते.

या प्रसंगी मा. सरपंच सुधाकर ढोरे, किरण भिलारे, महिला मोर्चा अध्यक्ष सुनीताताई भिलारे, माजी उपनगराध्यक्षा अर्चनाताई म्हाळसकर, नगरसेवक ॲड. विजयराव जाधव, किरण म्हाळसकर, रवींद्र म्हाळसकर, राणीताई म्हाळसकर, सुनंदा म्हाळसकर व सपना म्हाळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

भाजप पदाधिकाऱ्यांनी निवेदनामध्ये स्पष्टपणे नमूद केले की, “वडगांवच्या मूळ रहिवाशांना देशोधडीला लावणारा हा आराखडा स्वीकारार्ह नाही. शेतकऱ्यांच्या जमिनींवर अन्याय करणाऱ्या या आराखड्याविरोधात स्थानिकांचा तीव्र रोष आहे. सरकारने त्वरित हा आराखडा रद्द करून स्थानिकांचा सल्ला घेऊन नवा विकास आराखडा तयार करावा,” अशी मागणी करण्यात आली.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

भाजपकडून स्थानिकांच्या हक्कांसाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त भविष्यात जर प्रशासनाने दुर्लक्ष केले, तर वडगांव शहर भाजपा तर्फे लोकांबरोबर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!