Homeमहत्त्वाचेकामशेतमध्ये पोलिसांचा गांधीगिरीचा अवलंब — रॉंग साईडने जाणाऱ्यांना फुल देऊन जनजागृती

कामशेतमध्ये पोलिसांचा गांधीगिरीचा अवलंब — रॉंग साईडने जाणाऱ्यांना फुल देऊन जनजागृती

कामशेतमध्ये पोलिसांचा गांधीगिरीचा अवलंब — रॉंग साईडने जाणाऱ्यांना फुल देऊन जनजागृती

कामशेत : वाहतुकीतील वाढत्या बेफिकीरीवर अंकुश ठेवण्यासाठी कामशेत पोलिसांनी एक आगळीवेगळी आणि प्रेरणादायी मोहिम राबवली आहे. दंडाच्या भीतीपेक्षा जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी या हेतूने पोलिसांनी “गांधीगिरी”चा अवलंब केला. रॉंग साईडने वाहन चालवणाऱ्या चालकांना थांबवून त्यांना दंड न करता हातात एक सुंदर फूल देऊन नियमांचे पालन करण्याचा संदेश देण्यात आला. “नियम पाळा, जीव वाचवा” असा मानवतेचा संदेश देत या उपक्रमाने नागरिकांची मने जिंकली आहेत.

कामशेत पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी सकाळी कामशेत शहरातील मुख्य चौकात तैनात झाले होते. शहरात अनेकदा रॉंग साईडने वाहन चालवण्याच्या घटना घडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे या प्रवृत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि वाहतूक नियमांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

पोलिसांनी वाहनचालकांना थांबवून प्रथम त्यांना शांतपणे नियमभंगाचे गांभीर्य समजावून सांगितले. त्यानंतर हसत मुखाने गुलाबफूल देत सांगण्यात आले “आपण ज्या रस्त्याने चुकीने येत आहात, त्यातून अपघाताची शक्यता वाढते. कृपया नियम पाळा, स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवा.” या सौम्य आणि सकारात्मक संवादामुळे वाहनचालकही हसत प्रतिसाद देताना दिसले.

या मोहिमेत अनेकांनी आपल्या चुका मान्य केल्या. काहींनी त्वरित माफी मागून पुढे नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आश्वासन दिले. पोलिसांनी कोणावरही दंडात्मक कारवाई न करता “प्रेमाने समजावणे” या पद्धतीने जनजागृतीचा मार्ग अवलंबला.

या उपक्रमात स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकांनीही सहभाग घेतला. “सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन करा”, “थांबा, पाहा आणि मग जा” अशा घोषवाक्यांद्वारे जनतेला संदेश दिला. काही पोलिस बांधवानी नागरिकांना फुल देऊन वाहतूक शिस्तीचे महत्त्व पटवून दिले.

कामशेत पोलिस ठाण्याचे ठाणे अमंलदार राजेद्र पवार यांनी सांगितले की, “आमचा उद्देश दंड वसूल करणे नाही, तर नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करणे हा आहे. नागरिक जर स्वतःहून नियमांचे पालन करतील, तर वाहतुकीतील अराजकता कमी होईल आणि अपघातांनाही आळा बसेल.”

या गांधीगिरीच्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही कामशेत पोलिसांचा हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला असून, नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे. “फुलातून दिलेला संदेश दंडापेक्षा अधिक प्रभावी ठरतो,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

कामशेत पोलिसांनी पुढील काळात अशा प्रकारच्या जनजागृती मोहिमा नियमितपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!