Homeमहत्त्वाचेतळेगावात विद्युत डीपीचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली — नागरिकांचा विद्युत विभागावर संताप

तळेगावात विद्युत डीपीचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली — नागरिकांचा विद्युत विभागावर संताप

तळेगावात विद्युत डीपीचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली — नागरिकांचा विद्युत विभागावर संताप

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे शहरातील दाभाडे आळी भागात जुन्या राजवाड्याजवळ १३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास विद्युत वितरण पेटीचा (डीपी) मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर डीपीमधील गरम ऑईल चारही दिशांना उडाले आणि आजूबाजूच्या घरांच्या भिंती, छत तसेच अंगणात पसरले. सुदैवाने या वेळी परिसरातील घरे रिकामी असल्याने मोठी जीवितहानी टळली.

स्थानिकांच्या माहितीनुसार, ही डीपी गेल्या काही महिन्यांपासून बिघाडग्रस्त स्थितीत होती. रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही विद्युत विभागाने दुर्लक्ष केले, अशी नागरिकांची तक्रार आहे. अखेर या निष्काळजीपणामुळे आज सकाळी हा भीषण स्फोट झाला. या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

स्फोटाच्या आवाजाने स्थानिक नागरिक घराबाहेर धावले. डीपीमधून धूर आणि ऑईल बाहेर पडत असल्याचे त्यांनी पाहिले. काही वेळाने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आणि परिसरातील नागरिकांनी स्वतःच्या प्रयत्नाने परिसर सुरक्षित केला. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही, मात्र काही घरांच्या भिंती आणि लोखंडी गेटवर ऑईलचे डाग पडल्याचे दिसून आले.

स्थानिक रहिवासी संदीप पाटोळे, साईनाथ पाटोळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटोळे, चंद्रकांत शेलार, शंकर भोसले, श्रीकृष्ण भोसले आणि योगेश भोर यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाकडे तातडीने जुनी डीपी बदलण्याची मागणी केली आहे. “या डीपीमध्ये आधीही बिघाड होत होते. जर आज घरात लोक असते, तर मोठी दुर्घटना घडली असती. विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडली आहे,” असा नागरिकांचा आरोप आहे.

नागरिकांनी पुढे सांगितले की, विभागाने तात्काळ तपासणी करून परिसरातील सर्व जुन्या डीपींचे नूतनीकरण करावे, अन्यथा अशा घटना पुन्हा घडू शकतात. विद्युत विभागाने या घटनेची नोंद घेतली असून तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

तळेगावातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली असली तरी, विद्युत यंत्रणेतील दुर्लक्ष हा गंभीर प्रश्न बनत चालला आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!